Uddhav Thackeray  uddhav thackeray
महाराष्ट्र बातम्या

उध्दव ठाकरे म्हणाले, नारायण राणे तुम्ही कधीही काॅल करा पण...

नारायण राणे यांनी निधीसाठी उदय सामंत यांची भेट घेतली.

सकाळ डिजिटल टीम

नारायण राणे (Narayan Rane) यांनी निधीसाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांची रत्नागिरी (Ratnagiri) येथे आज भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवर संपर्क झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी फोनवर संपर्क केला. यावेळी ते म्हणाले, तुम्ही कधीही फोन करा, मी तुमचा फोन घेईन. पण, फक्त सावंतवाडीतून (Sawantwadi) बोलतोय असे सांगा अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे राणे यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसापासून केंद्रिय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यास सुरु आहेत. परंतु आज खुद्द नारायण राणे यांनी उदय सामंत यांची भेट घेतली. नारायण राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली गावचे नागरिक आणि माजी पंचायत समिती सदस्य आहेत. त्यांनी पालकमंत्री सामंत यांची आज भागातील विकासकामाच्या निधीसाठी भेट घेतली.

काय म्हणाले मुख्यमंत्री

माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे यांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांना काॅल केला तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, त्या नारायण राणे यांचा मी काॅल घेत नाही. तुम्ही काॅल केल्यावर सावंतवाडीहून नारायण राणे बोलतोय असं सांगा मी फोन घेईन असेही ते म्हणाल्याचे राणे यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, मला उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी कुणाचीही गरज पडत नाही. मी त्यांना थेट भेटतो. यावेळी त्यांनी ठाकरे यांनी बांधलेले शिवबंधन देखील अभिमानाने दाखवलं. उदय सामंत यांची भेट घेतल्यानंतर नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हि माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT