esakal

महाराष्ट्र बातम्या

BJP-Thackeray Alliance : भाजप–ठाकरे गटाच्या युतीला उद्धव यांची मूक संमती? ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

Uddhav Thackeray's indirect approval to BJP-Thackeray alliance : जाणून घ्या नेमकं असं काय घडलं? ज्यामुळे या चर्चांना सुरुवात झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

BJP and Shivsena UBT Alliance News : चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौर निवडणुकीनंतर भाजप आणि ठाकरे गटाच्या युतीने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नगरसेवकांना आज(मंगळवार) ‘मातोश्री’वर बोलाविण्यात आले होते.

या बैठकीत सत्तेत जाणे चुकीचे नाही. मात्र, पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे, असा सल्ला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना दिला. त्यामुळे भाजप–उबाठा युतीला ठाकरे यांनी अप्रत्यक्ष मूक संमती दिली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

या बैठकीत महापौर पदासाठी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून पक्षप्रवेशाच्या ऑफर आल्याची माहिती ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांना दिली. मात्र, जिल्ह्यात पक्षाचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी त्या ऑफर नाकारल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने महापौरपद देण्यास अनुकूलता न दाखवल्याने तर भाजपने सव्वा–सव्वा वर्ष महापौर पद वाटून घेण्याचा प्रस्ताव मान्य केल्याने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे यावेळी गिऱ्हे यांनी सांगितले. यासंदर्भात स्टॅम्प पेपरवर करार केल्याची माहितीही देण्यात आली.

तर प्राप्त माहितीनुसार, सर्व बाबी ऐकल्यानंतर सत्तेत जाणे चुकीचे नाही. मात्र, पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवणे महत्त्वाचे असल्याचा सल्ला यावेळी देण्यात आला. तसेच लोकांच्या कामांसाठी सत्ता आवश्यक असली तरी भाजपपासून सावध आणि चाणाक्ष राहा, आवश्यक तेथे विरोधाची भूमिका घ्या, संघटना मजबूत ठेवा आणि पक्ष वाढवा, असा स्पष्ट संदेश उद्धव ठाकरे यांनी उपस्थित नगरसेवकांना दिला.

दरम्यान, मनसेकडून नगरसेवकांना आर्थिक प्रलोभन दिल्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र, या आरोपांना फारसे महत्त्व न देता स्थानिक संघटनात्मक बळकटीवर भर देण्याचा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे समजते. यामुळे बैठकीनंतर भाजप– ठाकरे गटाच्या युतीला एकप्रकारे उद्धव ठाकरे यांनी ‘मूक संमती’ दिल्याची चर्चा होत आहे. या बैठकीला दोन अपक्ष नगरसेवक नंदू नागरकर आणि उपमहापौर प्रशांत दानव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट! कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी समिती स्थापन

Latest Marathi News Live Update : सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील स्थगिती उठली

Pune News : आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रभाग स्तरावर नियोजन करा; महापौर मंजूषा नागपुरे यांचे आदेश

Pune Crime : खंडणीसाठी युवकाचा स्वतःच्या अपहरणाचा बनाव; घरातूनच मागितली दोन लाख रुपयांची खंडणी

PAK vs ENG, T20 WC: “बॉल कुठे, बॅट फिरवतोस कुठे?” बाबर आजमची विकेट चर्चेत; पाकिस्तानचा पायावर कुऱ्हाड मारणारा निर्णय अन् इंग्लंडची सरशी

SCROLL FOR NEXT