Nrendra Modi  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Vedanta Foxconn : तोडगा काढण्यासाठी राज्यातून दिल्लीला जाणार 'त्रिमूर्ती'

वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Vedanta Foxconn Controversy : वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर राज्यात विरोधक आणि शिंदे-फडणवीस सरकारवर सर्वच स्तरातून जोरदार टीका केली जात आहे. यावरून वातावरण तापलेले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोनवर चर्चा केली होती. त्यानंतर आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे लवकरच पंतप्रधानांची भेट घेऊन चर्चा करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

या भेटीदरम्यान या सर्व वादावर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली जाऊ शकते. हा प्रकल्प राज्यातच रहावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी जास्तीत जास्त सुविधा देण्यात येतील हे देखील मोदींना या भेटीदरम्यान पटवून देण्याचा या तीनही मंत्र्यांचा प्रयत्न असणार आहे.

मोदींकडून शिंदेंना मोठ्या प्रोजेक्टचं गाजर?

वेदांता-फॉक्सकॉन कंपनीनेचा प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मंगळवारी रात्री फोनवरून संवाद साधला. यावेळी मोदींनी वेदांता-फॉक्सकॉन एवढाच किंवा यापेक्षा मोठा प्रकल्प काही दिवसांतच महाराष्ट्राला बेरोजगीरी दूर करण्यासाठी दिला जाईल असे आश्वासन दिल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.

दरम्यान पंतप्रधान मोदींनी मोठा प्रकल्प देण्याचं आश्वासन दिल्याचं शिंदे सरकारकडून सांगण्यात येत असलं तरी यापेक्षा मोठा प्रकल्प केंद्र सरकार काय देणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्यात आता वेदांता-फॉक्सकॉनवर तोडगा काढण्यासाठी शिंदे, राणे आणि फडणवीस दिल्लीत जाऊन मोदींशी प्रत्यक्षात भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Corruption News : पैसा डबल करण्याच्या आमिषाला पोलिसही बळी; एसपींच्या आदेशानंतर अधिकाऱ्यांची नावे समोर, घटनेने खळबळ

Manikrao Kokate: १९९६ चा खटला… दिवंगत बापासाठी मुलगी लढली अन् न्याय मिळून दिला, माणिकराव कोकाटेंविरोधात लढलेल्या ॲड. अंजली दिघोळे...

VIDEO : 'गावातील अंबानी शेतकऱ्याचं घर'! 20 एकरातील आलिशान घर पाहून नेटकरीही थक्क; गाड्यांपासून घोड्यांपर्यंत सर्व काही इथे आहे...

Viral Video: किती गोड! आजोबांनी रेल्वेत आजीसाठी केलं असं काही... व्हायरल व्हिडिओ पाहून आनंदाश्रू उभे राहतील

'त्याने माझे खराब व्हिडिओ पोस्ट केले होते' सोशल मीडियाचा अनुभव सांगताना प्राजक्ता माळी म्हणाली...

SCROLL FOR NEXT