Violence Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

मुस्लीम समाजाच्या मोर्चाला अमरावती, मालेगावमध्ये हिंसक वळण

त्रिपुरामधील घटनांच्या निषेधार्थ सुरू होते आंदोलन.

सुधीर काकडे

त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाला अमरावती, मालेगाव येथे शुक्रवारी हिंसक वळण लागले. आंदोलनकर्त्यांनी अमरावतीतील जयस्तंभ चौक आणि शहरातील विविध भागातील 20 ते 22 दुकानांची तोडफोड केली. तसेच मालेगावमध्येही आंदोलनाला हिंसक वळण लागले. भिवंडी, नांदेडमध्ये देखील अशा घटना घडल्याचे समोर आले आहे. सध्या या भागांमधील परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

त्रिपुरातील हिंसाचाराच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी मुस्लीम समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यातील अमरावती, मालेगाव, नांदेड आणि पुसद येथील आंदोलनाला हिंसक वळण लागले. अमरावती येथील जयस्तंभ चौक आणि अन्य भागात आंदोलकांनी दुकानाची तोडफोड केली. यानंतर पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आले. जमावाच्या दगडफेकीत एक जण जखमी झाला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले. नांदेड, मनमाड आणि पुसद येथेही जमावातील काहींनी तुरळक दगडफेक केल्याने तणाव निर्माण झाला. मात्र, पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली.

बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चे काढण्यासाठी पोलीस परवानगी देत नव्हते, असा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय. यावरुन हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या. बांगलादेशात झालेल्या हिंसाचारात सात जणांचा मृत्यू झाला होता. मंदिरांमध्ये नासधूस करण्यात आली होती. हिंदू अल्पसंख्याक असलेल्या बांगलादेशात शेकडो घर आणि मालमत्तांचं नुकसान करण्यात आलं होतं. मात्र त्याविरोधात पोलिसांनी आंदोलन करू दिलं नव्हतं. आणि मुस्लीम संघटनांना मात्र आंदोलनाची परवानगी देण्यात आली अशी तक्रार हिंदू संघटनांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT