Uday Samant  esakal
महाराष्ट्र बातम्या

Uday Samant : महाराष्ट्रातील 215 आमदारकीच्या आणि लोकसभेच्या 45 जागा आम्ही सहज जिंकू - उदय सामंत

महाराष्ट्रातील कोणीही आमदार नाराज असेल असे मला वाटत नाही.

सकाळ डिजिटल टीम

ग्रामीण भागातील जनतेने महायुतीच्या भूमिकेचा स्वीकार केला आहे. त्यामुळे आमदारकी आणि खासदारकी आमच्यासाठी खूप सोपी आहे.

चिपळूण : निधी वाटपावरून महायुतीमधील (Mahayuti) राष्ट्रवादीचा कोणताही आमदार नाराज नाही. महायुतीमध्ये गैरसमज पसरवण्याचा काम काहीजण बालिश पद्धतीने करत आहेत, असे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सोमवारी चिपळूण येथे पत्रकारांना सांगितले.

वाशिष्टी नदीतील गाळ काढण्याचे काम पावसाळ्यानंतर सोमवारपासून सुरू झाले. या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी पालकमंत्र्यांना राष्ट्रवादीचे आमदार निधी वाटपावरून नाराज असल्याचे पत्रकारांनी विचारल्यानंतर ते म्हणाले, ‘‘रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार आमच्यासोबत आहेत. त्यांनी निधी कमी पडल्याचे पालकमंत्री म्हणून किंवा मित्र म्हणून मला कधीही सांगितले नाही.

महाराष्ट्रातील कोणीही आमदार नाराज असेल असे मला वाटत नाही. महायुतीबद्दल कुठेतरी गैरसमज किंवा संभ्रम निर्माण करावा, असे काहींना वाटते. यातून युतीमध्ये दुरावा निर्माण होईल, असे काही जणांना वाटते; परंतु असे काहीही होणार नाही.

नुकताच ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागला. उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जे काय बोलले जात होते. २३२३ पैकी १४०० सरपंच महायुतीचे निवडून आले. इतर साडेचारशे पैकी दीडशे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. तेवढेच बीजेपी आणि राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आपली ताकद फार मोठी आहे, असे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न कोणी करू नये.

खासदारकी खूप सोपी

काँग्रेस पक्षाची भूमिका आता जनतेसमोर आली आहे. ग्रामीण भागातील जनतेने महायुतीच्या भूमिकेचा स्वीकार केला आहे. त्यामुळे आमदारकी आणि खासदारकी आमच्यासाठी खूप सोपी आहे. महाराष्ट्रातील २१५ आमदारकीच्या जागा आणि ४५ लोकसभेच्या जागा आम्ही सहज जिंकू, असा दावा पालकमंत्री सामंत यांनी केला.

खासदारकी खूप सोपी

काँग्रेस पक्षाची भूमिका आता जनतेसमोर आली आहे. ग्रामीण भागातील जनतेने महायुतीच्या भूमिकेचा स्वीकार केला आहे. त्यामुळे आमदारकी आणि खासदारकी आमच्यासाठी खूप सोपी आहे. महाराष्ट्रातील २१५ आमदारकीच्या जागा आणि ४५ लोकसभेच्या जागा आम्ही सहज जिंकू, असा दावा पालकमंत्री सामंत यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT