Weather Forecast monsoon will hit Mumbai on June 10 and 11 monsoon arrival in Maharashtra  
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Update : यंदा मुंबईत 'या' तारखेला येणार मान्सून! उष्णतेपासून दिलासा कधी? तज्ज्ञांनी दिली माहिती

सकाळ डिजिटल टीम

राज्यात माघील काही दिवसांपासून उष्णतेचा पारा वाढला आहे. अनेक जिल्ह्यात वाढलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. यादरम्यान मान्सुनची वाट पाहिली जात आहे. यादरम्यान यंदाच्या मान्सून आगमनाची तारीख समोर आली आहे. भारतीय हवामान विभाग (IMD), मुंबई आणि प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख (वेस्टर्न इंडिया) आणि शास्त्रज्ञ सुनील कांबळे यांनी 'द इंडियन एक्सप्रेस'ला याबद्दल माहिती दिली आहे.

यंदा महाराष्ट्रात कधी येणार?

महाराष्ट्रात मान्सुनचे आगमन आणि त्याच्या वाटचालीबद्दल माहिती देताना कांबळे यांनी सांगितले की, या वर्षी एप्रिलमध्ये जारी केलेल्या हवामानाच्या दिर्घकालीन अंदाज म्हणजेच LRF (Long Range Forecast) नुसार महाराष्ट्रात 96% पर्यंत सामान्य मान्सून राहाणार आहे. याचा अर्थ असा की राज्यात सरासरी 87 मिमी पाऊस पडेल.

तसेच त्यांनी सांगितलं की, सध्याच्या LRF नुसार 10 आणि 11 जून रोजी मान्सून मुंबईत दाखल होईल. तर मान्सून कसा प्रवास करेल आणि तो उत्तरेकडे केव्हा आणि कसा सरकेल, हे या महिन्याच्या अखेरीस कळेल असेही त्यांनी सांगितलं.

यंदा कमी पावसामुळे राज्यातील काही भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवू शकते का? याबद्दल माहिती देताना हवामान विभागाकडून सांगण्यात आलं की, जेव्हा आम्ही LRF दिले तेव्हा आम्ही स्पष्टपणे सांगितले आहे की राज्यात 96% पर्यंत सामान्य मान्सून अनुभवेल. काही दुर्मिळ स्थितीमध्ये काही भागात कमी पावसाची शक्यता आहे.

दरम्यान तरी देखील परिस्थिती फार चिंताजनक नसेल. कारण, संपूर्ण महाराष्ट्रात 90% पेक्षा जास्त सामान्य पावसाचा अंदाज आहे आणि काही ठिकाणी 30% पावसाची कमतरता असण्याची शक्यता आहे, जी फार जास्त नाही. तसेच योग्य शक्यता लक्षात याव्यात यासाठी आम्ही मे महिन्याच्या अखेरीस आमचा अंदाज पुन्हा अपडेट करत आहोत, तेव्हा चित्र अधिक स्पष्ट होईल, असेही सुनील कांबळे यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ward Structure: पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर; राजकीय सोय बघून प्रभागांमध्ये बदल?

Uddhav Thackeray : संघटनात्मक बांधणी भक्कम केल्याशिवाय ते जिंकले कसे, आपण हरलो कसे याची उत्तरे मिळणार नाहीत : उद्धव ठाकरे

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Ambad News : अंबड तालुक्यातील लालवाडी तांडा नंबर 1 वर घडली दुर्दैवी घटना; तलावात पाय घसरून अकरा वर्षीय राजवीर राठोड याचा बुडून मृत्यू

Latest Marathi News Live Update: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काँग्रेस आक्रमक, तहसीलदारांसोबत बाचाबाची

SCROLL FOR NEXT