WhatsApp spying is shocking country will not tolerate it says Jayant Patil
WhatsApp spying is shocking country will not tolerate it says Jayant Patil 
महाराष्ट्र

हेरगिरीचा प्रकार धक्कादायक; देश हे सहन करणार नाही- जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा

पुणे : व्हाट्सअप हेरगिरीचा प्रकार हा धक्कादायक असून सरकारने याबाबत कडक पावले उचलावीत. देश अशा प्रकारच्या गोष्टी कधीही सहन करणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत म्हटले आहे. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते.

काही दिवसात प्रसार माध्यमातून स्क्रुटिनचा प्रकार धुमाकूळ घालतोय. एनएसआय कंपनीमार्फत देशातल्या काही लोकांच्या माहिती काढल्या जात आहेत, गुजरातमध्ये मागच्या काळात घेडलेला हा प्रकार घडला होता, आता इतर ठिकाणीही घडतोय ही चिंतेची बाब आहे. चौदाशे लोक फेसबुकवर आहेत ज्यांच्यावर यावरून नजर होती. सॉफ्टवेरमार्फत पाळत ठेवली जाते हे फेसबुकने आधी सांगितले होते. याबाबत संपूर्ण माहिती केंद्र सरकारला मे महिन्यापासून होती, याबातची मीहिती केंद्र सरकारने सर्वांसमोर आणावी असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

सत्तेच्या समीकरणाबाबत मी बोलणार नाही- देवेंद्र फडणवीस

काही संघटनावर पाळत ठेवण्यासाठी 5लाख 50 डॉलर खर्च झाला असल्याचे कळलं आहे असं कळलं, मग हा खर्च कोणी आणि का केला, ही औथोरिटी त्यांना कोणी दिली? याचाही शोध घ्यायला हवा असेही यावेळी जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

पुणेकरांनो पाणी जरा जपून वापर; कारण...

देशात अशा प्रकारे पाळत ठेवत आहेत, रशियाची एजन्सी म्हणजे आम्ही कोणालाही ते पाळत ठेवण्याची यंत्रणा विकत नाही, मग त्यांनी केंद्र सरकारलाच ती यंत्रणा विकली असावी, मग कोणाला पाळत ठेवण्यात रस आहे? हे सुद्धा समोर येईल, त्यांनी यादी जाहीर करवी नाहीतर फेसबुक जाहीर करेलच, असही पाटील यांनी म्हटले आहे.

लक्ष तक पहुंचने में मजा आता है- संजय राऊत

कोणाच्या सांगण्यावरून परवानगीवरून पाळत ठेवण्यात आली याची माहिती भारतातील जनतेला मिळायला हवी. महाराष्ट्रात दलित नेत्यांना नक्षली ठरवण्यात आलं, त्यांच्यावर अशी पाळत ठेवली होती का? त्या माहितीच्या आधारावर त्यांना नक्षली ठरवलं का? त्याचा गैरफायदा घेण्यात आला का? असे अनेक प्रश्न या माध्यमातून उपस्थित होत असल्याचेही पाटील यांनी म्हटले. तसेच, या प्रकरणाची एसआयटीमार्फत सरकारनं याची चौकशी करावी अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT