Sanjay-Nirupam-Congress 
महाराष्ट्र बातम्या

संजय निरूपम म्हणाले, 'पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा दिवस लांब नाही'!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारपर्यंत (ता.4) अर्ज करण्याची मुदत आहे. जवळजवळ सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले असून अजून काहीजण उद्या दुपारपर्यंत आपले उमेदवारीचे अर्ज भरणार आहेत. 

यावेळेस काही नव्या चेहऱ्यांना सर्व पक्षांनी संधी दिली असून जुन्या चेहऱ्यांना डच्चूही दिला आहे. त्यामुळे सध्या सर्वच पक्षांमध्ये प्रस्थापितांच्या नाराजीबाबतची चर्चा सगळीकडे होत आहे. याला काँग्रेसदेखील अपवाद ठरला नाही.

काँग्रेसचे फायरब्रँण्ड मुंबई अध्यक्ष आणि माजी खासदार संजय निरूपम यांनी अखेर काँग्रेसच्या प्रचारातून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. सध्या काँग्रेसमधे जे सुरू आहे, ते अनाकलनिय असून निवडणुका लढण्याची काँग्रेसची इच्छाचं हरवली असल्याची अगतिकता निरूपम यांनी व्यक्त केली आहे.

पक्षाची वाताहत सुरू असतानाही पक्षाचे नेते दरबारी राजकारणातून बाहेर पडत नाहीत. स्थानिक समीकरणं समजून उमेदवारी देत नाहीत, असा आरोप करत यावेळी काँग्रेसच्या प्रचारात उतरणार नसल्याची घोषणाच निरूपम यांनी केली आहे.

काँग्रेसचा माजी मुंबई अध्यक्ष आणि माजी खासदार असताना केवळ एका विधानसभेसाठी समर्थकाला उमेदवारी द्यावी, अशी विनंती संजय निरूपम यांनी केली होती. मात्र, ती विनंती काँग्रेसने डावलल्याने व्यथित झाल्याचे ट्विट निरूपम यांनी केले आहे. यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये नव्या वादाला फोडणी मिळाली असून अनेक काँग्रेस नेते नाऊमेद झाल्याची चर्चा रंगली आहे.

याप्रकारची वागणूक पक्षाकडून मिळाल्याने संजय निरुपम कमालीचे नाराज झाले आहेत. पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा दिवस लांब नसल्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला आहे. हा सूचक इशारा काँग्रेस किती गांभीर्याने घेतं याकडे सर्व राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस, जोतिबा डोंगरावर वीज कोसळून ५ जण जखमी

सोलापूरकरांसाठी खुशखबर! सोलापूर-हैदराबाद विमानसेवेचे आजपासून बुकिंग, १७ एप्रिलला पहिले उड्डाण; तिरुपती विमानसेवा कधी? वाचा...

मिरवणुकीत ‘डीजे’ऐवजी ४ कर्णे/स्पीकरसाठी परवानगी! परवाना देताना पोलिसांनी विचारली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, वाद्य व मिरवणूक मार्गाची माहिती

Pune PMC Promotion Race: अतिरिक्त आयुक्तपदासाठी पुणे मनपातील चार वरिष्ठ अधिकारी दावेदार; पदोन्नती प्रक्रिया, सत्ताधाऱ्यांची संमती व नगरविकास विभागाची मंजुरी ठरणार निर्णायक

LSG vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सचा दबदबा, रिषभ पंतच्या संघाची निघाली हवा; अक्षर पटेलच्या नेतृत्त्वाची जबदरस्त झलक, समोर माफक लक्ष्य

SCROLL FOR NEXT