YCMOU Admission  esakal
महाराष्ट्र बातम्या

YCMOU MBA Admission : मुक्‍तच्‍या एमबीए प्रवेशासाठी 30 पर्यंत ऑनलाइन प्रवेश परीक्षा; जाणून घ्या प्रवेश वेळापत्रक

सकाळ वृत्तसेवा

YCMOU MBA Admission : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठातर्फे एमबीए शिक्षणक्रम २०२३-२४ च्‍या प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेतून पात्रता मिळवत प्रथम वर्षात प्रवेश घेता येईल.

प्रवेश परीक्षेच्‍या नोंदणीची मुदत २९ ऑगस्‍टपर्यंत असून, ३० ऑगस्‍टपूर्वी नोंदणीकृत विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या सवडीनुसार ऑनलाइन प्रवेश परीक्षा देता येईल.

अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी शैक्षणिक अर्हतेची अट पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. ( ycmou MBA admission Online entrance exam till 30th august maharashtra news)

राज्‍यस्‍तरावर विस्‍तार असलेल्‍या या विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण घेण्याची संधी राज्‍यभरातील विद्यार्थ्यांना उपलब्‍ध आहे. एमबीएला प्रवेश घेण्यासाठी प्रवेशपरीक्षा बंधनकारक आहे.

ऑनलाइन पद्धतीने घेतल्‍या जाणाऱ्या या प्रवेशप्रक्रियेत यशस्‍वी विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चित करता येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्‍या पोर्टलवर ऑनलाइन प्रवेश परीक्षा अर्ज व शुल्‍क भरावयाचे असून, नोंदणीकृत विद्यार्थ्यांना सराव परीक्षा देता येईल. त्‍यानंतर मुख्य प्रवेश परीक्षा देता येईल.

अशी असेल प्रवेशप्रक्रिया

प्रवेश परीक्षेत पात्र झालेल्‍या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्‍या संकेतस्‍थळावरून प्रवेश पर्यायाद्वारे प्रवेश निश्‍चितीची प्रक्रिया पूर्ण करावी.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ऑनलाइन प्रवेश अर्ज भरताना शिक्षणक्रम आणि अभ्यास केंद्र तसेच विषयांची निवड करून शुल्‍क ऑनलाइन पद्धतीने भरावयाचे आहे.

प्रवेश अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर मुख्यालयातील नोंदणी कक्षाशी संपर्क साधून आपली पात्रता तपासून घ्यावी. त्‍यानंतरच प्रथम वर्षाचा प्रवेश निश्‍चित झाला, असे समजण्यात येईल. प्रवेश परीक्षेत पात्र नसलेल्‍या विद्यार्थ्यांना पुन्‍हा नोंदणी करून परीक्षेला सामोरे जाता येईल, असेही विद्यापीठाने स्‍पष्ट केले आहे.

प्रवेशाचे वेळापत्रक असे

- प्रवेश परीक्षेच्‍या नोंदणीची मुदत : २९ ऑगस्ट

- ऑनलाइन परीक्षा देण्याची मुदत : ३० ऑगस्‍ट

- प्रवेश निश्‍चितीची मुदत : ३१ ऑगस्‍ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT