72 Hooren Movie controversy Teaser the kerala esakal
मनोरंजन

72 Hooren : 'द्वेष फार काळ चालणार नाही बाळा!' केरळ स्टोरीनंतर '72 हुरे' चा वाद

सध्या सोशल मीडियावर द केरळ स्टोरीनंतर ७२ हुरे नावाच्या चित्रपटावरुन वादाला सुरुवात झाल्याचे दिसून येते आहे.

युगंधर ताजणे

72 Hooren Movie controversy Teaser the kerala : प्रसिद्ध दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्या द केरळ स्टोरीवरुन मोठ्या वादाला सुरुवात झाली होती. भलेही त्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली असली तरी त्या चित्रपटाच्या विषयावरुन सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे. धर्मांतर आणि दहशतवाद सारख्या विषयाची मांडणी केरळ स्टोरीमधून करण्यात आली होती.

सध्या सोशल मीडियावर द केरळ स्टोरीनंतर ७२ हुरे नावाच्या चित्रपटावरुन वादाला सुरुवात झाल्याचे दिसून येते आहे. त्यावर काश्मिर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सणसणीत प्रतिक्रियाही दिली आहे. जी चर्चेत आली आहे. केरळ स्टोरीविषयी सांगायचे झाल्यास या चित्रपटाला मिळणारा प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यावरुन होणारा वाद, काही ठिकाणी त्याच्या प्रदर्शनावर घालण्यात आलेली बंदी यामुळे वेगळ्याच चर्चेला उधाण आले होते.

Also Read - Self Respect चा प्रवास दूराग्रहाकडे नको

यासगळ्यात ७२ हुरे नावाच्या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हायरल झाला असून त्यावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. यावेळी पुन्हा एकदा कट्टर धर्मिय व्यक्तींनी, काही संघटनांनी त्यावरुन दिलेल्या प्रतिक्रिया लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. सोशल मीडियावर ७२ हुरे नावाच्या चित्रपटाचा फर्स्ट लूक हा ट्रेडिंगचा विषय आहे. यासगळ्यात प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

पवन मल्होत्रा आणि आमिर बशीर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होतती. अशोक पंडित यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचा टीझर अशावेळी आला आहे जेव्हा देशामध्ये लव जिहाद वरुन वेगळ्या प्रकारची चर्चा सुरु आहे.

कारण या विषयावर द केरळ स्टोरी सारख्या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हा चित्रपट ७ जुलै रोजी प्रदर्इत होणार आहे. अग्निहोत्री यांनी अशोक पंडित यांचे अभिनंदन केले आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असे त्यांनी म्हटले आहे.

त्यावर एका युझर्सनं दिलेली प्रतिक्रिया अनेकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. मुस्लिम लोकांना नकारात्मक दृष्ट्या दाखवून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. तेव्हा प्रेक्षकांनी सजगपणे त्या गोष्टींचा विचार करावा. दुसऱ्या युझर्सनं लिहिलं आहे की, द्वेष हा काही फार वेळ चालणारा नाही हे सगळ्यांनी लक्षात घेण्याची गोष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका! डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह बड्या ब्रँड्सवर FDAची धाड; 5 परवाने निलंबित

IND vs SL 1st Test: देवदत्त पडिक्कल IN, सर्फराज खान OUT! गंभीरने खेळपट्टी पाहिली अन् Playing XI ठरली; जाणून घ्या संभाव्य संघ

Surat-Chennai Expressway : परंडा-तुळजापूर तालुक्यातील 31 गावांत भूसंपादन वेगात; शेतकऱ्यांना मिळणार कोट्यवधींचा मोबदला, 481 हेक्टर क्षेत्र ताब्यात

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला ३ हजार रुपये, पुन्हा सामाजिक न्याय विभागाकडून निधी वर्ग; राज्य सरकारचा मोठा निर्णय

IND vs SL 1st Test: गौतम गंभीरने खेळपट्टीची पाहणी केली, पाठ वळताच क्युरेटरने 'खेळी' खेळली; कॅप्टन, कोचने एकवटले... माईंड गेम

SCROLL FOR NEXT