Aai Kuthe Kay Karte latest update ashutosh saves yash life arundhati deshmukh family sakal
मनोरंजन

Aai Kuthe Kay Karte: मोठा ट्विस्ट! यशने केली आत्महत्या; पण अनिरुद्ध ऐवजी आशुतोषनं पार पाडलं बापाचं कर्तव्य..

'आई कुठे काय करते' मालिका रंजक वळणावर..

नीलेश अडसूळ

Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' ही मालिका आता अत्यंत रंजक वळणावर आली आहे. आपण मालिकेत पाहिलेच की काही दिवसांपूर्वीच यश आणि गौरी यांचे नातेसंबंध संपले. गौरीने अगदी विचित्र प्रकारे यशला सोडल्याने तो मानसिक धक्क्यात गेला.

अशातच इशाचा म्हणजे त्यांच्या बहिणीचा साखरपुडा झाला. त्यामुळे आपण एकटे आहोत ही भावना त्याला प्रचंड सतावत होती. त्यात त्याची आई म्हणजे अरुंधतीही लग्न करून दुसऱ्या घरी गेल्याने त्याचा मोठा आधार निसटला.

परिणामी एकटा पडल्याने यशने आत्महत्येचा प्रयत्न केला, असे मालिकेत दाखवण्यात आले आहे. त्यामुळे मालिका अत्यंत महत्वाच्या टप्प्यात आली आहे.

(Aai Kuthe Kay Karte latest update ashutosh saves yash life arundhati deshmukh family)

'आई कुठे काय करते' या मालिकेत आपण पाहणार आहोत की, यश घरात नसल्याने सर्वच मंडळी चिंतेत आहेत. तेवढ्याच देशमुखांच्या घरी यशच्या अपघाताची बातमी येते. संजना घरातील सर्वांना यशच्या अपघाताची बातमी सांगते. त्यानंतर सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते.

यशला भेटण्यासाठी घरातील सर्व मंडळी रुग्णालयात येतात. त्यावेळी त्यांना कळतं की यश एका टेकडीवरुन खाली पडला आहे. दरम्यान ज्या व्यक्तीने त्याचा जीव वाचवलेला असतो, तो आशुतोष कडे जाऊन हा अपघात नसून आत्महत्या असल्याचा पुरावा देतो.

हे ऐकून आशुतोषला मोठा धक्का बसतो. त्याच वेळी यशने आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनाही समजते. त्यामुळे पोलिस यश वर गुन्हा दाखल झाल्याचे सांगून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी येतात.

पण आशुतोष मध्ये पडतो आणि पोलिसांना समजवतो आणि यशची निर्दोष मुक्तता करतो. त्यामुळे घरचे सगळेच आशुतोषचे आभार मानतात. अरुंधती परदेशात गेली असल्याने यश एकटा पडलेला असतो पण आशुतोष मात्रा या प्रसंगात बाप म्हणून यशच्या पाठीच्या उभा राहतो. आणि अनिरुद्ध मात्र केवळ अरुंधतीला दोष देत राहतो. आता पुढे काय होणार हे आगामी भागात कळेलच..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: नव्या वर्षापासून रुग्णालयात जेवण बंद, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांची अडचण; कारण काय?

Elephant Viral Video: अरे बापरे! हत्तीची ही शक्ती पाहून डोळे फुटतील! काही क्षणातच उचलली भारी ट्रॉली, जणू खेळणीच! व्हिडिओ व्हायरल

Accident News: दुर्दैवी! काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलीसह तीन जणांचा मृत्यू; घटनेनं हळहळ, काय घडलं?

Nagpur Municipal Election 2026 : नागपुरात भाजपच्या दाव्यांना बंडखोरीचे ग्रहण; काँग्रेसचीही खास रणनीती, मनपात कुणाची येईल सत्ता?

सीन शूट करताना जितेंद्र जोशीला खरोखरच फास लागला ! अभिनेत्याने सांगितली भयानक आठवण, म्हणाला..

SCROLL FOR NEXT