Movie Box Office Collection News Movie Box Office Collection News
मनोरंजन

Box Office Collection : आमिर, अक्षयमध्ये जोरदार टक्कर; कोण अधिक फ्लॉप?

दोन्ही चित्रपटांमध्ये कमाईसाठी टक्कर पाहायला मिळत आहे

सकाळ डिजिटल टीम

Movie Box Office Collection News बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारचा रक्षाबंधन हा चित्रपट आमिर खानच्या (Aamir Khan) लाल सिंग चड्ढा या चित्रपटाशी स्पर्धा करीत आहे. बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत दोन्ही चित्रपटांमध्ये चुरशीची स्पर्धा आहे. आतापर्यंत आमिर खानचा लाल सिंग चड्ढा हा अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) रक्षाबंधनाच्या पुढे होता. मात्र, मंगळवारी (ता. १६ ऑगस्ट) रक्षाबंधनाने लाल सिंह चड्ढापेक्षा जास्त कमाई केली आहे.

अनेक दिवसांपासून बॉलिवूडचे चाहते लाल सिंग चड्ढा आणि रक्षाबंधनाच्या रिलीजची वाट पाहत होते. रक्षाबंधनाच्या खास मुहूर्तावर दोन्ही चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाले. लाल सिंग चड्डा आणि रक्षाबंधन यांच्याकडून चाहत्यांना चांगल्या कमाईची अपेक्षा होती. परंतु, दोन्ही चित्रपटांना लाँग वीकेंडचा फायदा मिळाला नाही.

एकीकडे आमिर खानचा (Aamir Khan) लालसिंग चड्ढा अद्याप ५० कोटी जमा करू शकलेले नाही. दुसरीकडे अक्षय कुमारच्या चित्रपटाने १६ ऑगस्टला आमिरच्या चित्रपटापेक्षा जास्त कमाई केली आहे. मंगळवारी लालसिंग चड्ढाची कमाई दोन कोटी होती. मात्र, अक्षय कुमारच्या चित्रपटाने सहाव्या दिवशी २.१० कोटींचा व्यवसाय केला आहे. ७० कोटींमध्ये बनलेल्या रक्षाबंधन चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन ३६.५७ कोटी झाले आहे. चित्रपटाचे बजेट काढणेही कठीण झाले आहे.

रक्षाबंधनाची कमाई हळूहळू वाढत आहे. मात्र, आतापर्यंत या चित्रपटाने जेवढी कमाई केली आहे ती चांगली नाही. यावर्षी अक्षय कुमारचा (Akshay Kumar) हा तिसरा फ्लॉप चित्रपट आहे. आमिरच्या चित्रपटाला रक्षाबंधनापेक्षा चांगले रिव्ह्यू मिळत आहेत. असे असूनही सहाव्या दिवशी लाल सिंग चड्ढाने अक्षयच्या चित्रपटापेक्षा कमी व्यवसाय केला.

दोन्ही चित्रपटांमध्ये टक्कर

लाल सिंग चड्ढाने सहा दिवसांत ४८ कोटींची कमाई केली आहे तर रक्षाबंधनने ३६.५७ कोटींचा व्यवसाय केला आहे. परंतु, रक्षाबंधनने मंगळवारी लाल सिंग चड्डापेक्षा चांगली कमाई केली. हे पाहता दोन्ही चित्रपटांमध्ये कमाईसाठी टक्कर पाहायला मिळत आहे. आता कोणता चित्रपट किती कमाई करेल हे जाणून घेण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल.

आगामी चित्रपट निराश करणार?

लाल सिंह चड्ढा आणि रक्षाबंधन या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांना निराशा केली आहे. आशा आहे की आगामी चित्रपट कलेक्शन आणि कथेच्या बाबतीत चाहत्यांना निराश करणार नाही. आगामी चित्रपटात हृतिक रोशनचा विक्रम वेध, रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ब्रह्मास्त्र आणि बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा पठाण यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT