Akshay kumar And Aamir Khan  esakal
मनोरंजन

आमिर-अक्षय समोरासमोर, एकाच दिवशी दोघांचे चित्रपट होणार प्रदर्शित

आमिर खान आणि अक्षय कुमार बाॅलीवूडचे दोन मोठे सुपरस्टार आहेत. या दोघांचेही चित्रपट ऑगस्ट महिन्यात एकाच तारीखेला प्रदर्शित होणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

आमिर खान आणि अक्षय कुमार बाॅलीवूडचे दोन मोठे सुपरस्टार आहेत. या दोघांचेही चित्रपट ऑगस्ट महिन्यात एकाच तारीखेला प्रदर्शित होणार आहेत. आमिर खानची (Aamir Khan) 'लालसिंह चड्ढा' आणि अक्षय कुमारची रक्षाबंधन पुन्हा एकदा खिलाडी कुमार आणि मिस्टर परफेक्शनिस्टची बाॅक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. याचा अर्थ तुम्हाला ११ ऑगस्ट रोजी बाॅक्स ऑफिसवर दोन सुपरस्टार्सची चित्रपटांच्या दरम्यान संघर्ष पाहायला मिळेल. मात्र तुम्ही जाणता का यापूर्वी १३ वर्षांपूर्वी यांच्या चित्रपटांमध्ये संघर्ष झालेला आहे. (Aamir Khan And Akshay Kumar's Two Films Release On This August)

एकाच दिवशी प्रदर्शित झाली होती ही चित्रपटे

२००७ मध्ये जेव्हा अक्षय कुमारची 'वेलकम' (Welcome) आणि आमिर खानची 'तारे जमीन पर' (Taare Zameen Par) ही चित्रपटे एकाच दिवशी प्रदर्शित झाली होती. वेलकममध्ये अक्षय कुमार (Akshay Kumar) व्यतिरिक्त कॅतरिना कैफ, नाना पाटेकर, अनिल कपूर, परेश रावल यासारखे कलाकार होते. हा एक विनोदी चित्रपट होता. अनीस बजमी यांनी तो दिग्दर्शित केला होता. चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. बाॅक्स ऑफिसवर जवळपास १२२ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.

दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट बनवला होता

दुसरीकडे 'तारे जमीन पर' आमिर खानने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होता. यात आमिर आणि दर्शील सफारीने मुख्य भूमिका केली होती. चित्रपटात ८ वर्षांच्या मुलाची कथा आहे, जो दुर्मिळ आजाराने त्रस्त असतो. या चित्रपटाचे देखील प्रेक्षक आणि समीक्षकांनी कौतुक केले होते. तिने बाॅक्स ऑफिसवर जवळपास ६१ कोटी रुपये कमवले होते.

आजही प्रेक्षकांना हे दोन्ही चित्रपट आवडतात

गेल्या १५ वर्षांमध्ये दोन्ही चित्रपटांनी टीव्हीवर प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आहे. या दोन्ही चित्रपटांचे चाहते पूर्ण देशात आहेत. आता पाहायचे आहे, की येणाऱ्या ११ ऑगस्टला जनता कोणत्या सुपरस्टारच्या चित्रपटाला जास्त पसंती देतात. पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार आणि पुन्हा एकदा आपण सर्व बाॅक्स ऑफिस संघर्षाचे साक्षीदार होऊ. तुमच्या मतानुसार या लढाईत कोण हरणार आणि कोण जिंकणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

Magnesium & Vitamin D Deficiency: व्हिटॅमिन-D ची पातळी कमी होण्यामागे असू शकतो 'या' खनिजांचा अभाव, 'हे' अन्नपदार्थ ठरतील उपयुक्त

SCROLL FOR NEXT