Aamir Khan, Kareena Kapoor's Laal Singh Chaddha trailer to release on IPL finale. Details inside Google
मनोरंजन

IPL फायनल मॅचमध्ये असं कधीच घडलं नव्हतं, मात्र आमिर खान घडवून आणणार, वाचा..

आमिर खान सध्या 'लाल सिंग चड्ढा' मुळे चर्चेत आहे. पण आता IPL फायनल मॅचमध्ये तो असं काय करणार आहे याचीही चर्चा रंगलीय.

प्रणाली मोरे

अभिनेता आमिर खानला(Amir Khan) बॉलीवूडमध्ये परफेक्शनिस्ट म्हणूनही ओळखलं जातं. त्याची काम करण्याची पद्धत सिनेइंडस्ट्रीतील अनेकांसाठी एक आदर्श ठरली आहे. मग अगदी सिनेमात वेगवेळ्या भूमिका साकारुन प्रयोगशील राहणं असो की सिनेमांचे हटके विषय असोत की अगदी त्याच्या प्रमोशनच्या इंट्रेस्टिंग आयडिया असोत,आमिरचं सारंच एकदम भन्नाट अंदाजात असतं बुवा. तो नेहमी आपल्या कामातून नाविन्य देण्याचा प्रयत्न करतो. आता आपल्या आगामी 'लाल सिंग चड्ढा' सिनेमासाठी त्यानं आखलेल्या मास्टर प्लॅनविषयी जाणून घ्याल तर तुम्ही थक्क व्हाल एवढं निश्चित. आमिर खाननं आपल्या या सिनेमाच्या ट्रेलर लॉंचचा दिवस ठरवला आहे. तो कधी आणि कसा ट्रेलर लॉंच करणार आहे ते चला जाणून घेऊया .

आमिर खानने 'लाल सिंग चड्ढा'(Lal Singh Chaddha)च्या ट्रेलर रिलीजसाठी एक खास प्लॅन बनवला आहे. खूप दिवसांपासून या सिनेमाची प्रतिक्षा प्रेक्षक करत आहेत. आता आमिरनं सिनेमाच्या प्रदर्शनाआधी प्रेक्षकांसाठी या सिनेमासंदर्भात गूड न्यूज आणली आहे. जी बातमी आहे सिनेमाच्या ट्रेलरची. यासंदर्भात एक नवी आणि हटके बातमी हाती लागली आहे.

आमिर खान आणि करिना कपूर अभिनित 'लाल सिंग चड्ढा' सिनेमाचा ट्रेलर २९ मे,२०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. आणि हा दिवस आहे 'आयपीएल'च्या फिनालेचा. अख्ख्या जगातील क्रिक्रेटप्रेमींचे डोळे या दिवसाची प्रतिक्षा करत असतात. आणि याच दिवशी आमिर खान आपल्या 'लाल सिंग चड्ढा' सिनेमाचा ट्रेलर लॉंच करणार आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला मिळालेल्या बातमीनुसार आमिर खाननं या ट्रेलर लॉंचचा ग्रॅंड प्लॅन बनवला आहे. आयपीलच्या शेवटच्या मॅचच्या दिवशी २९ मे रोजी 'लाल सिंग चड्ढा' सिनेमाचा ट्रेलर लॉंच करण्यात येईल. IPL फिव्हर सोबतच आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' सिनेमाची क्रेझही चाहत्यांच्या मनावर राज्य करेल हे निश्चित.

असं पहिल्यांदाच होणार आहे,जिथे लाइव्ह क्रिकेट मॅच सुरू असताना एखाद्या सिनेमाचा ट्रेलर लॉंच होईल. 'लाल सिंग चड्ढा'चा ट्रेलर स्टार स्पोर्ट्सवर लाइव्ह प्रसारित होणार आहे. २९ मे रोजी आयपीएलच्या फायनल मॅचच्या दुसऱ्या सत्रात 'लाल सिंह चड्ढा' सिनेमाचा ग्रॅंड ट्रेलर लॉंच केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shalinitai Patil Passes Away: माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं मुंबईत राहत्या घरी निधन

IND vs SA. 5th T20I: भारताने जिंकली मालिका! आधी हार्दिक-तिलकने चोपलं अन् मग चक्रवर्तीने फिरकीच्या जाळ्यात द. आफ्रिकेला अडकवलं

T20 World Cup साठी संघ निवडीच्या एक दिवस आधीच शुभमन गिल टीम इंडियातून बाहेर; BCCI ने दिले अपडेट्स

Car Loan: नवीन कार घेणार असाल तर खुशखबर! 'या' बँका देत आहेत कार कर्जावर सर्वात कमी व्याजदर, एकदा यादी पाहाच!

बनावट दारु विक्री! देशी-विदेशी दारू, हातभट्टी अन्‌ विविध विदेशी ब्रॅंडची बनावट टोपणे जप्त; सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांची कारवाई

SCROLL FOR NEXT