Ghajini 2 on cards Esakal
मनोरंजन

Ghajini 2: 15 वर्षांनंतर पुन्हा संजय सिंघानियाची एंट्री! आमिर खानच्या 'गजनी'चा येणार सिक्वेल?

Vaishali Patil

Aamir Khan Ghajini 2: आमिर खानचे जगभरात प्रचंड चाहते आहेत. आमिरला देशभरातील लोक मोठ्या संख्येने पसंत करतात. आमिरला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटले जातं. आमिरचा एखाद वर्षात एक एकच चित्रपट रिलिज करतो मात्र त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दहशत निर्माण करतो असं काहीसं चित्र गेल्या अनेक वर्षापासून दिसत होत.

मग त्यात 3 इडियट असो किंवा दंगल सारखे सिनेमे. मात्र गेल्या काही वर्षांपासून आमिरचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर एकापाठोपाठ एक फ्लॉप होत आहेत. त्यात 'लाल सिंह चढ्ढा' असो किंवा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'. त्यामुळे आमिरने आता या फ्लॉप चित्रपटांनंतर सध्या अभिनयातून ब्रेक घेतला आहे.

दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आता आमिर त्याच्या सुपरहिट सिनेमा 'गजनी' या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये काम करणार आहे. आमिरच्या गजनीमध्ये संजय सिंघानिया आणि कल्पना यांची प्रेमकहाणी सर्वाना लक्षात असेलच. आमिर खान आणि असीनने दमदार अभिनयाने हा चित्रपट हिट झाला. यात दिवंगत अभिनेत्री जिया खान देखील दिसली होती.

आता इतक्या वर्षांनी संजय पुन्हा एकदा पडद्यावर पुनरागमन करत आहे. आमिर खान 'गजनी'चा सिक्वेल बनवणार आहे. यासाठी तो देखील आता सलमान सारखा दक्षिण मनोरंजन सृष्टीकडे वळला आहे. त्याने अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांची भेट घेतली आहे.

पीपिंगमून या न्यूज पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार, आमिर खान सध्या अल्लू अर्जुनचे वडील आणि साऊथ सिनेसृष्टीचा मोठे चित्रपट निर्माता अल्लू अरविंद यांच्यासोबत एका प्रोजेक्टवर काम करत आहे. चित्रपट निर्माते अल्लू अरविंद यांनीही 'गजनी 2' संदर्भात आमिर खानसोबत एक कल्पना शेअर केली आहे. दोघेही एकत्र काम करण्यास उत्सुक आहेत. तरी अद्याप कशाचीही पुष्टी झालेली नाही.

असे असले तरी, दोघांनाही संजय सिंघानियाची कथा पुढे नेण्याची इच्छा असून काही महिन्यांत स्क्रिप्ट फायनल करणार असल्याचं बोललं जात आहे. सध्या सर्व काही गुप्त ठेवण्यात आले आहे.

गजनी हा चित्रपट गजनी या तमिळ चित्रपटाचा रिमेक होता आणि भारतीय बॉक्स ऑफिसवर १०० कोटी कमावणारा हा चित्रपट पहिला चित्रपट ठरला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT