Aamir Khan's Laal SIngh Chaddha Boxoffice Collection in Trouble,big new, what we know,read Google
मनोरंजन

Laal Singh Chaddha रिलीज झाल्यानंतर काही तासात आमिरला पुन्हा बसला झटका...

आमिर खानचा बहुचर्चित लाल सिंग चड्ढा सिनेमा 11 ऑगस्ट,2022 रोजी जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.

प्रणाली मोरे

Laal Singh chaddha: आमिर खानचा बहुचर्चित लाल सिंग चड्ढा सिनेमा जगभरात सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. सिनेमाविषयी प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पण बहुतांशी लोकांना लाल सिंग चड्ढा पसंतीस उतरला आहे. अनेक सेलिब्रिटींनीही लाल सिंग चड्ढाला ब्लॉकबस्टर पदावर नेऊन बसवलं आहे. आमिर खानच्या अभिनयाची देखील प्रशंसा होताना दिसत आहे. पण भरपूर वादानंतर आता कुठे सिनेमाविषयी थोडं बरं घडत असताना आमिर खानला सिनेमामुळे पुन्हा मोठा झटका बसल्याची बातमी कानावर पडत आहे.(Aamir Khan's Laal SIngh Chaddha Boxoffice Collection in Trouble,big new, what we know,read)

बॉयकॉट ट्रेंड मुळे आमिर खानचा सिनेमा रिलीजआधीच खूप चर्चेत आला होता. यामुळे खूपजणं आमिरचा लाल सिंग चड्ढा पाहण्यासाठी उत्सुक होते. पण आमिर खानच्या अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीत. आमिरचा ड्रीम प्रोजेक्ट लाल सिंग चड्ढा रिलीज झाला आणि त्याच्याविषयी मोठी बातमी कानावर पडली की हा सिनेमा ऑनलाइन लीक झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,लाल सिंग चड्ढा Tamilrockers, Movierulz आणि पायरेसी बेस्ड अशा अनेक वेबसाईटवर लीक करण्यात आला आहे. Telegram वर देखील सिनेमा लीक झाल्याची बातमी समोर आली आहे. बोललं जात आहे की काही टेलीग्राम ग्रुप्सवर सिनेमाला फ्री डाऊनलोड करण्याचं ऑप्शन देखील दिलं जात आहे.

रिलीजच्या दिवशीच सिनेमा लीक झाल्यामुळे लाल सिंग चड्ढाच्या बिझनेसमध्ये मोठं नुकसान होऊ शकतं. आमिर खानने आपल्या चाहत्यांना विनंती केली आहे की त्याचा सिनेमा पहायला थिएटरमध्ये अवश्य जा. अशामध्ये आता सिनेमा ऑनलाईन लीक झाल्याने लोक थिएटरमध्ये जाणार नाहीत आणि अर्थातच याचा परिणाम सिनेमाच्या बॉक्सऑफिस कलेक्शनवर होणार. पण हे पहिल्यांदाच घडत नाही, याआधी अनेकदा अशा घटना घडलेल्या आहेत.

लाल सिंग चड्ढा ऑस्कर विनिंग हॉलीवूड सिनेमा फॉरेस्ट गम्पचा रीमेक आहे. रक्षाबंधनच्या दिवशी म्हणजेच ११ ऑगस्ट,२०२२ रोजी हा सिनेमा सिनेमागृहात रिलीज झाला आहे. अक्षय कुमारच्या रक्षाबंधन सिनेमाशी लाल सिंग चड्ढाची बॉक्सऑफिसवर टक्कर झाली आहे, कारण रक्षाबंधन देखील ११ ऑगस्ट रोजी रिलीज झाला आहे. आता पहायचं कोणत्या सिनेमाला प्रेक्षक अधिक पसंत करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘टीईटी’चा निकाल १५ जानेवारीपूर्वी! उत्तरसूचीवरील आक्षेपासाठी २८ डिसेंबरपर्यंत मुदत; प्रत्येक उत्तरपत्रिकेची होणार फेरपडताळणी, पुढच्या वर्षी दोनदा ‘टीईटी’

सोलापूर शहरातून 2 वर्षांत 155 जण तडीपार अन्‌ 50 गुन्हेगारांची येरवडा कारागृहात रवानगी; पोलिस आयुक्तांची रेकॉर्ड ब्रेक कारवाई; गुन्हेगारांचे धाबे दणाणले

आजचे राशिभविष्य - 24 डिसेंबर 2025

Winter Special Recipe: नेहमीच्या नाश्त्याला कंटाळलात? फक्त 15 मिनिटांत बनवा ‘हे’ क्रिस्पी कांदा ब्रेड पकोडे, घरच्यांकडून मिळेल कौतुक

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 डिसेंबर 2025

SCROLL FOR NEXT