R Balki's 'Ghoomer' Esakal
मनोरंजन

R Balki's Ghoomer: आर बाल्कीच्या 'घूमर'ने होणार मेलबर्नच्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलची सुरुवात

Vaishali Patil

R Balki's 'Ghoomer': अभिनेता अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर अभिनीत चित्रपट निर्माता आर बाल्की दिग्दर्शित "घूमर", 12 ऑगस्ट 2023 रोजी इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न (IFFM) मध्ये प्रदर्शित होणार आहे. मेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सवात 'घूमर' या चित्रपटाची निवड झाली आहे. 'घूमर' असून जा एक सिनेमॅटिक चित्रपटाचा उत्कृष्ट नमुना ठरला आहे.

आर बाल्की यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'घूमर' प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज झाला असून लवकरच प्रतिष्ठित 14 व्या भारतीय चित्रपट महोत्सव ऑफ मेलबर्न (IFFM) मध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

निर्मात्यांच्या मते, हा चित्रपट 'एक पक्षाघाती खेळाडू (खेर) च्या विजयाची कहाणी सांगतो जो आपल्या प्रशिक्षकाच्या (बच्चन) मार्गदर्शनाखाली क्रिकेटपटू म्हणून उत्कृष्ट कामगिरी करतो.' 'चीनी कम' आणि 'की एंड का'साठी प्रसिद्ध असलेल्या बाल्की यांनी राहुल सेनगुप्ता आणि ऋषी विरमानी यांच्यासोबत चित्रपटाची कथा लिहिली आहे.

आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतीय चित्रपटाचा उत्सव साजरा करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या महोत्सवात यापुर्वी 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', 'नीरजा', 'कपूर अँड सन्स', 'दंगल', ‘ बाहुबली‘ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.

दिग्दर्शक आर बाल्की म्हणतात " घूमर हा IFFM मधील ओपनिंग चित्रपट असेल ही आमच्यासाठी खरोखरच सन्मानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. घूमर हा खेळावर आधारित चित्रपट असणार आहे."

एक अग्रगण्य फिल्ममेकर म्हणून बाल्की सध्या चर्चेत आहेत. दिग्दर्शक बाल्की यांच्याबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी भारतीय चित्रपट उद्योगात स्वतः च अनोखं स्थान निर्माण केलं आहे. याचे चित्रपट अनेकदा अपारंपरिक विषयांचा शोध घेतात आणि बौद्धिक आणि भावनिक अशा दोन्ही पातळ्यांवर प्रेक्षकांना प्रभावित करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

AUS vs SA, ODI: दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील सर्वात मोठा पराभव, तरी जिंकली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका; पाहा काय झाले रेकॉर्ड

Cheteshwar Pujara Retirement : निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला किती पेन्शन मिळणार? BCCI चे नियम काय सांगतो?

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Bribe Case : एक कोटी घ्या आणि प्रकरण मिटवा; अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यालाच उचलला, लाच देणं पडलं महागात

SCROLL FOR NEXT