Actor Nakul Mehta asks Pakistanis not to break their tv after losing to team india. Google
मनोरंजन

'प्रिय शेजाऱ्यांनो...', टीम इंडियाकडून हरल्यावर नकुलचा पाकिस्तानला मजेशीर सल्ला

'बडे अच्छे लगते है २' चा स्टार नकुल मेहताने भारताकडून पाकिस्तानला मॅचमध्ये हार पत्करावी लागल्यानंतर मजेशीर ट्वीट केले जे तुफान व्हायरल झाले.

प्रणाली मोरे

Asia Cup 2022 मध्ये पाकिस्तानचा (Pakistan)भारताकडून(India) दारुण पराभव झाला अन् संपूर्ण देशात जल्लोषाचं वातावरण पहायला मिळालं. भारताच्या या दणदणीत विजयावर अभिनेता नकुल मेहतानं पाकिस्तान विरोधात एक मजेदार ट्वीट केलं आहे. टीम इंडियानं रविवारी २८ ऑगस्ट रोजी दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियममध्ये आशिया कप २०२२ साठी खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला आहे.(Actor Nakul Mehta asks Pakistanis not to break their tv after losing to team india.)

छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहतानं भारताच्या या विजयानंतर पाकिस्तानच्या नागरिकांना ट्वीट करत मजेशीर अंदाजात निरोप दिला आहे. नकुलनं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, ''प्रिय शेजाऱ्यांनो,कृपया तुमच्या टी.व्हीला फोडू नका. तर त्यावर माझ्या मालिकेचा आनंद घ्या, क्रिकेटमध्ये काय ठेवलंय''. नकुलने पाकिस्तान भारताकडून हरल्यानं त्याची मस्करी करत तिथल्या लोकांना टी.व्ही नं फोडता त्यावर आपली मालिका पाहण्याचा आग्रह धरला आहे.

नकुलच्या या ट्वीटवर आता पाकिस्तानी लोकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. एकानं लिहिलं आहे की,'काही काही होत नाही, आम्ही तंसही कॉमेडी शो आणि उत्तम संगीताचे दर्दी आहोत. शुभेच्छा'. तर आणखी एकानं पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची खिल्ली उडवत लिहिलं आहे की,'अर्ध्याहून अधिक देशासोबत अर्थव्यवस्थाही पाण्यात बुडून गेली आहे. नवा टी.व्ही सेट घेणं आम्हाला आता परवडणार नाही,आता मीम्स वरच आम्ही आनंद मानू'. तर एका नेटकऱ्यानं नकुलच्या 'बडे अच्छे लगते है २' मालिकेची खिल्ली उडवत लिहिलं आहे,'अल्लाह जवळ प्रार्थना करतो मिस्टर कपूर आणि प्रियामधलं भांडण कधीच मिटू नये'. तर दुसऱ्या एकानं लिहिलं आहे की,'आमच्या टी.व्ही वर तुमचा शो लागत नाही'.

नकुल मेहतानं २०१२ मध्ये स्टार प्लस वरील 'प्यार का दर्द है,मीठा मीठा,प्यारा प्यारा' या मालिकेतून छोट्या पडद्यावर काम करायला सुरुवात केली होती. त्यानंतर 'इश्कबाज' आणि 'दिल बोले ओबेरॉय' सारख्या शो मध्ये देखील तो दिसला होता. नकुल सध्या 'बडे अच्छे लगते है २' मध्ये राम कपूरच्या भूमिकेत दिसत आहे. या मालिकेतील त्याच्या भूमिकेच कौतूक करत त्याला पुरस्कारानं देखील गौरविण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather : पुण्यात थंडीला सुरुवात; पाच दिवसांत पारा येणार आणखी खाली

Wardha Crime: प्रेमसंबंधास नकार, तरुणीचा आवळला गळा तरुणीचा अन्...

Gold Rate Today : सोन्याचे भाव पुन्हा वाढले, चार दिवसांच्या घसरणीला ब्रेक; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

Balasaheb Thorat: जनमत महाविकास आघाडीच्या बाजूनेच: बाळासाहेब थोरात; शिर्डीत महाविकास आघाडीचा मेळावा, निवडणुकीत सक्रिय सहभाग घेणार

Nagpur Crime: कौटुंबिक वादातून पुतण्याकडून काकाचा खून; पारडीतील घटना, चाकूने वार करीत संपविले

SCROLL FOR NEXT