Actor Prakash Raj Uddhav Thackeray  esakal
मनोरंजन

चाणक्य आज लाडू खात असतील; पण तुमचा सच्चेपणा..; प्रकाश राज यांची उद्धव ठाकरेंसाठी पोस्ट

सकाळ डिजिटल टीम

‘तुम्ही खूप छान काम केलंत सर, महाराष्ट्रातील जनता नेहमी तुमच्या पाठीशी उभी राहील.'

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray Resigns) मुख्यमंत्रिपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिलाय. बुधवारी रात्री साडेनऊ वाजता त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली. त्यानंतर रात्री साडेअकरा वाजता त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेऊन त्यांचा राजीनामा सुपूर्द केलाय.

बुधवारी सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) दिलेल्या निर्णयानंतर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आता उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियावर सामान्य जनतेसह सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा सत्तासंघर्ष सुरू असताना अनेक घडामोडींवर ट्वीटद्वारे सतत प्रतिक्रिया देणारे सुप्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी देखील ट्विटरवर एक पोस्ट लिहित उद्धव ठाकरेंचं कौतुक केलंय.

बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीचे प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज हे नेहमी आपल्या बेधडक वक्तव्यांमुळं चर्चेत असतात. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचं कौतुक करत एक पोस्ट लिहिलीय. उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ही पोस्ट लिहिलीय. ‘तुम्ही खूप छान काम केलंत सर! @OfficeofUT.. आणि मला खात्री आहे की, तुम्ही ज्या पद्धतीनं राज्य सांभाळलं, त्यासाठी महाराष्ट्रातील जनता नेहमी तुमच्या पाठीशी उभी राहील.. चाणक्य आज लाडू खात असतील; पण तुमचा सच्चेपणा अधिक काळ टिकून राहील.. तुम्हाला आणखी बळ मिळो!’, असं त्यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये लिहिलंय.

महाराष्ट्राची जनता जिंकली : अभिनेता आरोह वेलणकर

अभिनेता आरोह वेलणकर (Actor Aroh Welankar) यानंही मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर ट्वीट केलंय. 'महाराष्ट्राची जनता जिंकली' असं ट्वीट आरोहनं केलंय. हे ट्वीट केल्यानंतर त्याला अनेकांनी पाठिंबा दिलाय, तर बऱ्याच जणांनी त्याला ट्रोल देखील केलंय. याआधी अभिनेता आरोह वेलणकर एका मुलाखतीमध्ये म्हणाला होता, की शिवसेनेनं (Shiv Sena) एकनाथ शिंदे यांना मोठं केलं असं वारंवार बोललं जात आहे. मग, एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेसाठी खूप काही केलं आहे, याची जाणीव शिवसेनेला असायला हवी. आज ठाण्यात शिवसेना आहे, ती केवळ एकनाथ शिंदे यांच्यामुळं आहे. त्यामुळं त्यानींही शिवसेनेला भरभरून दिलंय, असं आरोह म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रेनच्या शौचालयात ‘प्रेम’ व्यक्त करणाऱ्यांनो सावधान! आता कुणाचा नंबर किंवा नाव लिहिलंत तर...; रेल्वे प्रशासनाचा थेट इशारा

पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक चार्जिंग... एसटी पेट्रोल पंप सर्वांसाठी खुले होणार! सुविधा कुठे उपलब्ध असणार?

Vegetable Vendor Wins 11 crore Lottery Video : नशीब असावं तर असं! मित्राच्या पैशाने लॉटरीचं तिकीट खरेदी केलेल्या भाजी विक्रेत्याने जिंकलं तब्बल ११ कोटींचं बक्षीस

Accident News : हृदयद्रावक घटना! लोहोणेरजवळ मिक्सर गाडीखाली चिरडून आठवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा

Uddhav Thackeray : सरकारने दिलेले पॅकेज ही शेतकऱ्याची थट्टा- उद्धव ठाकरे!

SCROLL FOR NEXT