Actor Suriya Completes 25 Years In Cinema  esakal
मनोरंजन

Suriya : सूर्याने केले सिनेसृष्टीत २५ वर्ष पूर्ण, चाहत्यांचे मानले आभार !

अभिनेता सूर्याने चित्रपट विश्वात २५ वर्ष पूर्ण केले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Actor Suriya Completes 25 Years In Cinema : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक असलेल्या सुर्या शिवकुमारने आज चित्रपटसृष्टीत २५ वर्षे पूर्ण केली आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांच्या या जबरदस्त अभिनेत्याने १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नेरुक्कू नेर' या चित्रपटाद्वारे पदार्पण केले आणि आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत ५० चित्रपटांमध्ये काम केले आहे.

आपला खास दिवस अधिक खास बनवण्यासाठी, सुरियाने सोशल मीडियावर त्याच्या प्रवासासाठी आणि उद्योगातील योगदानाबद्दल एक प्रेमळ संदेश लिहिला आहे. सूर्याने आपल्या २५ वर्षांच्या प्रवासाचे वर्णन 'सुंदर आणि धन्य' असे केले.

सुर्याने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर आपल्या या प्रवासाबद्दल आनंद व्यक्त केला. सूर्याने (Actor Surya) आपल्या चाहत्यांचे आभार मानण्यासाठी ट्विटर हँडलवर लिहिले, खरंच सुंदर आणि आशीर्वाद २५ वर्षे..! स्वप्न आणि विश्वास..! तुमचा सूर्या. दोन दशकांच्या कारकिर्दीत सूर्याने सिनेसृष्टीला अनेक उत्कृष्ट, संस्मरणीय आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. सूर्याच्या दमदार कामगिरीमुळे त्याचे चाहते केवळ दक्षिणेतच नाही तर जगभरात आहेत.

वडील शिवकुमार यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, सुर्याने तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. २५ वर्षांच्या कारकिर्दीत सूर्याने जवळपास ५० चित्रपटांमध्ये काम केले. सूर्याचा पहिला चित्रपट 'नेरुक्कू नेर' भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केला होता. (Entertainment News)

तेव्हापासून सूर्याने प्रत्येक चित्रपटात आपला सर्वोत्तम अभिनय करुन आपली क्षमता सिद्ध केली आहे. 'लव्हर बॉय' असो, 'आर्मी ऑफिसर' असो किंवा 'मास हिरो' असो, हा अभिनेता सर्व काही आणि काहीही करू शकतो आणि त्याची फिल्मोग्राफी त्याचा पुरावा आहे.

अनेक धमाकेदार चित्रपट करून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या सुर्याच्या नावावर अनेक पुरस्कार आहेत. सुर्याने २५ वर्षांच्या कारकिर्दीत दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चार दक्षिण फिल्मफेअर पुरस्कार, तीन तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार जिंकले.

विशेष म्हणजे सुर्या हा दक्षिणेतील असाच एक अभिनेता आहे, ज्याचे चित्रपट ऑस्करपर्यंत (Oscar) पोहोचले आहेत. 'जय भीम' (Jay Bhim) आणि 'सोरारई पोत्रू' ऑस्करसाठी नामांकन झाले होते. पण ती अंतिम फेरीत प्रवेश करू शकले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Frank Caprio : प्रसिद्ध अमेरिकन न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेचा श्वास

Yavatmal Accident: शिक्षकांना ने-आण करणाऱ्या ट्रॅव्हलरला ट्रकची धडक; १२ शिक्षक जखमी, चार गंभीर, जीवितहानी नाही

सोलापुरात रोखले १५१ बालविवाह! मेच्या उन्हाळी सुटीत सर्वाधिक बालविवाह; आता बालविवाह जमविणारे, विवाहाला आलेले व विवाह लावणाऱ्यांना होणार ‘एवढी’ शिक्षा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात घरच्या घरी बनवा स्प्राउट अन् पनीर कबाब, सोपी आहे रेसिपी

Manoj Jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात; २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा निर्धार, मांजरसुंबा येथे अंतिम इशारा सभा

SCROLL FOR NEXT