Actress Bipasha Basu dream about her baby... Instagram
मनोरंजन

'मी आई होण्याचा विचार केला तेव्हापासूनच...',बिपाशानं सांगूनच टाकलं

बिपाशा बासूने काही दिवसांपूर्वी आपण आई होणार असल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केलं होतं.

प्रणाली मोरे

Bipasha Basu: बॉलीवूडच्या(Bollywood) टॉपच्या अभिनेत्री सध्या एकापाठोपाठ एक अशी गूड न्यूज देताना दिसत आहेत. सोनम कपूरला नुकताच पुत्ररत्नाचा लाभ झाला. आता लाडकी आलिया भट्टही पुढील ४- ५ महिन्यात आई बनणार आहे. तिच्या पाठोपाठ बिपाशा बासूही आई बनण्याचा आनंद अनुभवणार आहे. बिपाशानं काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर आपण आई होणार असल्याची बातमी फोटोपोस्टच्या माध्यमातून सांगितली होती. सध्या बिपाशाची स्वारी 'सातवे आसमानपर' आहे. वयाच्या ४३-४४ व्या वर्षी बिपाशा आई बनण्याचा आनंद अनुभवतेय. नुकत्याच एका मुलाखतीत बिपाशानं आपल्या बाळाविषयीच्या काही मनातल्या इच्छा बोलून दाखवल्यात. काय म्हणाली आहे बिपाशा बासू?(Actress Bipasha Basu dream about her baby...)

सध्या बिपाशाच्या घरात बाळाला घेऊन खूपच उत्साहाचं वातावरण आहे. घरात बाळासाठी स्पेशल खोली सजवून सज्ज केली जातेय. तिचा नवरा अभिनेता करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बाळ जन्माला आल्यावर काय करायचं ,कोणत्या गोष्टींपासून त्याला सुरक्षित ठेवायचं,त्याचं संगोपन कसं करायचं याविषयीच्या गोष्टी स्वतः नोंदवून ठेवत आहेत.

बिपाशा त्या मुलाखतीत म्हणाली,''आई तर मी होतेय पण एक स्त्री म्हणून माझ्यावर थोडा ताणही आहे. शरीरात होणारे बदल आणि त्याचा मनावर होणारा परिणाम यामुळे थोडा त्रास होतो. पण होणाऱ्या बाळाच्या जन्माचा आनंद त्यावर मात करतोय असं देखील अभिनेत्री म्हणाली. पण कधी-कधी आई म्हणून माझ्याकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षा,सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं कधी-कधी अतिश्योक्ती करुन माझ्या बाबतीत प्रेगनेन्सीची चर्चा व्हायची किंवा अजूनही होते हे सगळं ताण वाढवणारच होत आणि आहे. मला आई बनण्यास उशिर झाला यावरनं रंगलेली चर्चा आता मला आठवायची देखील नाही. आता मी आणि करण आई-बाबा बनणार यातच सुख दडलेलं आहे''.

''पण आमच्या दोघांची एक मनोमन इच्छा आहे की आम्हाला जे बाळ होईल ती 'मुलगी' असावी. आम्ही खूप आशावादी आहोत याबाबतीत. मला माहित आहे,मला जे बाळ होईल ते देवाचं सुंदर गिफ्ट असणार, आणि मग ते बाळ मुलगी की मुलगा काहीही असो ते आमचं असणार आहे, पण तरीही कुठेतरी एक सुप्त इच्छा आमच्या मनात दाटून आहे आणि आम्ही ठरवूनही टाकलं आहे की आम्हाला मुलगीच होणार. जेव्हापासून आम्ही आपल्याला बाळ हवंय असं ठरवलं तेव्हापासून ती मुलगीच असावी ही आमची इच्छा राहिली आहे''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT