deepti devi 
मनोरंजन

अभिनेत्री दीप्ती देवीलाही नैराश्याने ग्रासले होते; जाणून घ्या कशी केली त्यावर मात...

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : मराठी चित्रपट तसेच हिंदी व मराठी मालिकामध्ये काम करणारी अभिनेत्री म्हणजे दीप्ती देवी. साधारणतः तीन वर्षांपूर्वी दीप्तीची मानसिक अवस्था काहीशी बिकट होती. तिला नैराश्याने घेरलेले होते. मात्र तिला या नैराश्यातून बाहेर काढले ते योगाने. शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी योगा किती महत्त्वाचा आहे हे तिला त्यानंतर कळले आणि आजही ती दररोज योगा करते. तिची योगा ट्रेनर सीमा वेंगुर्लेकर आहे. तिच्याकडे तिने योगाभ्यासाचे धडे घेतले आणि आता आनंदी व स्वच्छंदी असे जीवन दीप्ती जगत आहे.  

अभिनेत्री दिप्ती देवी सांगते, की तीन वर्षापूर्वी मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या चांगल्या स्थितीत नव्हते. चिंता, नैराश्याने मला ग्रासलेले होते. मला नेमके काय झाले आहे हेच कळत नव्हते. मनात सतत वेगवेगळे विचार येत होते. मात्र योगाभ्यासाव्दारे माझ्यात शारीरिक-मानसिकदृष्ट्या खूप सकारात्मक बदल घडवून आणले. 

माझी पचनशक्ती वाढण्यापासून ते माझी चेहऱ्याची कांती सुधारणे आणि माझी एकाग्रता वाढविण्यापर्यंत माझ्यात झालेला बदल हा योगामुळे झाला आहे. अभिनेत्री दिप्तीच्या ट्रेनिंगबाबत योगा ट्रेनर रीमा वेंगुर्लेकर सांगते, की दिप्तीचा योगा क्लासमधला पहिला दिवस मला आजही आठवतोय. तिथपासून आजपर्यंतचा तिचा योगाभ्यातला प्रवास सोपा नव्हता. 

आरोग्यविषयक तक्रारींशिवाय तिच्या शरीरात लवचिकता अजिबात नव्हती. पण तिने स्वत:वर मेहनत घेतली. त्यामूळे सकारात्मक बदलांकडे आपोआपच तिची वाटचाल सुरू झाली. खरं तर तीन महिन्यांच्या कालावधीतच तिच्यातले बदल हळूहळू दिसू लागले होते. प्रत्येकाच्याच आयुष्यात एक ‘बॅड फेज’ किंवा ‘लो फेज’ येते. पण त्यावर मात करून तुम्ही सशक्तपणे कसे उभे राहू शकता, हे नियमित योगाभ्यास करून दिप्तीने दाखवलंय. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT