actress Rasika Sunil and siddharth bodke new marathi drama natak diet lagna coming show sakal
मनोरंजन

Rasika Sunil: सुपर हॉट रसिका सुनील करतेय ‘Diet लग्न’.. काय आहे प्रकरण?

अभिनेत्री रासिका सुनीलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी..

नीलेश अडसूळ

Rasika Sunil new Drama: झी मराठी वरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली रसिका ही मराठीतील एक दमदार अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने साकारलेले शनाया हे पात्र आजही प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत.

केवळ मालिकाच नाही तर चित्रपटातूनही तिने स्वतःला सिद्ध केले आहे. रसिकाचा हॉटनेस आणि तिचे फोटो हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. रासिकाने दोन वर्षांपूर्वीच आपल्या प्रियकरासोबत लग्नगाठ बांधली.

पण आता पुन्हा एकदा ती लग्न करणार आहे, पण लग्न 'Diet लग्न' असणार आहे. आता हा नेमका काय प्रकार आहे, हे जाणून घेऊया..

(actress Rasika Sunil and siddharth bodke new marathi drama natak diet lagna coming show)

हेल्थ कॉन्शियस हा शब्द हल्ली सगळ्यांच्या तोंडी सर्रास ऐकायला मिळतो. त्यामुळे डाएट हे देखील सगळ्यांच्या आयुष्याचा भाग बनून गेला आहे ‘डाएट’ची योग्य व्याख्या सांगायची तर ती म्हणजे संतुलित असा आहार.

आहाराच्या या पॅटर्न प्रमाणे नात्यांना संतुलित राखणाऱ्या ‘Diet लग्न’ या नव्या पॅटर्नबद्दल चांगलीच चर्चा रंगली आहे. अभिनेत्री रसिका सुनील आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके यांनी ‘Diet लग्न’ चा हा पॅटर्न आजमावून पाहिला आहे.

रिलेशनशिप बॅलन्स करण्यासाठी हे ‘Diet लग्न’ एक उत्तम पर्याय असू शकतो का? हे तपासायचं असेल तर रंगभूमीवर येणारं ‘Diet लग्न’ हे नवं नाटक नक्की पाहायला हवं.

‘रिलेशनशिप बॅलन्स करणारं क्रिस्पी नाटक’ अशा टॅग लाइनचं हे नाटक लेखिका मनस्विनी लता रवींद्र हिच्या लेखणीतून उतरलं असून दिग्दर्शक विजय केंकरे यांनी हे नाटकं दिग्दर्शित केलं आहे.'

'या नाटकाद्वारे विजय केंकरे आपलं १०१ वा नाटक दिग्दर्शित करीत आहे. आदित्य सूर्यवंशी आणि सविता सूर्यवंशी या (Marathi Natak) नाटकाचे निर्माते आहेत.'

'चांगल्या नाटकात उत्तम रंगकर्मींसोबत काम करण्याची संधी मिळतेय, हे नक्कीच आमच्या दोघांसाठी आंनदायी असून आमचं हे ‘Diet लग्न’ प्रेक्षकांना खात्रीशीर मनोरंजनाची हमी देईल असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला.'

ऋता आणि आलोक या जोडप्याची ही कथा आहे. काही कारणाने बिघडलेला नात्याचा समतोल साधण्यासाठी हे दोघे समुपदेशकांनी सांगितलेला 'Diet लग्न' हा पर्याय स्वीकारतात. हे करत असताना त्यांचे नातं कोणतं वळणं घेणार? हे मार्मिक पद्धतीने दाखविणार हे नाटक आहे.'

' रसिका सुनील, सिद्धार्थ बोडके, वैष्णवी आर पी या त्रिकुटाच्या ‘Diet लग्न’ च्या शुभारंभाचे प्रयोग शुक्रवार ९ जून ला श्री.शिवाजी मंदिर, दादर दुपारी ४.०० वा. आणि शनिवार १० जून सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली येथे दुपारी ४.३० वा. रंगणार आहे.

‘Diet लग्न’ नाटकाचे संगीत आनंद ओक यांचे आहे. नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचे तर प्रकाश योजना शीतल तळपदे यांची आहे. वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT