'मैं पंजाब की कतरिना' असं तिचं वाक्य..हे सुरवातीला ऐकल्यावर सर्व लोक तिला हसू लागले मात्र त्यानंतर तिने स्वत:ला असं सिद्ध केलं की ती केवळ पंजाब पुरता मर्यादित न राहिली नाही. तिने आता भारतच नाही तर जगातही तिचं नावं कमावलं आहे. ही गोष्ट आहे शहनाजची..तिला खरी ओळख मिळाली ती बिगबॉसच्या घरातून. एक निरागस आणि भोळा चेहरा, मस्तीखोर अशी ओळख असलेल्या शहनाज गिलचा आज वाढदिवस आहे.
पंजाबची राजधानी चंदीगडमध्ये 27 जानेवारी 1994 रोजी तिचा जन्म झाला. सर्व साधारण स्टार्स सारखं शहनाज गिलला देखील लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती, ज्यामुळे तिने लहानपणापासूनच मॉडेलिंग सुरू केले.
वयाच्या 16 व्यावर्षी सगळे तिला कतरिना म्हणू लागले. कतरिना म्हणून ओळखलं जाणं हे शहनाजसाठी एक मोठी प्रशंसा वाटायची. याचा तिला खूप आनंद झाला. तेव्हापासून शहनाज स्वतःला पंजाबची कतरिना म्हणू लागली.
पंजाबमधील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमधून पदवी घेतल्यानंतर शहनाज गिलने अभिनय क्षेत्रात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र या प्रवासात शहनाजचे कुटुंबीय हे आवडतं नव्हते.
शहनाजने तिच्या मॉडेलिंग करिअरची सुरुवात 2015 मध्ये गुरविंदर ब्रारसोबत 'शिव दी किताब' या म्युझिक व्हिडिओद्वारे केली होती.यानंतर 2016 मध्ये त्याने कंवर चहलच्या 'माझे दी जट्टी' गाण्यात काम केले. पंजाबी गाण्यांनी इंडस्ट्रीत प्रवेश करणाऱ्या शहनाज गिलला २०१७ साली 'सतश्री अकाल इंग्लंड' हा पंजाबी चित्रपट ऑफर करण्यात आला, ज्याने तिचे नशीबच बदलून टाकले.
चित्रपट आणि गाण्यांमध्ये काम करून पंजाबमध्ये ठसा उमटवणाऱ्या शहनाजने 'बिग बॉस 13' मध्ये स्पर्धक म्हणून प्रवेश केला. शोमध्ये आल्यानंतर तिची लोकप्रियता इतकी वाढली होती की 'बिग बॉस 13'च्या सुरुवातीला 'पंजाब की कतरिना' अशी ओळख करून देणारी शहनाज गिल शोच्या शेवटी 'इंडियाची शहनाज' बनली होती.
शहनाज लवकरच सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.