actress tejashri pradhan shares throwback bridal photo with veteran actor dr mohan agashe sakal
मनोरंजन

Tejashri Pradhan: अखेर इतक्या वर्षांनी योग आला.. फोटो शेअर करत तेजश्रीनं दिली गुड न्यूज..

तेजश्री प्रधानच्या त्या फोटोनं उडवली खळबळ..

नीलेश अडसूळ

'होणार सून मी या घरची' आणि 'अग्गं बाई सासूबाई' या मालिकेमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अत्यंत थोड्या कालावधीतच तेजश्रीला लोकांचे भरभरून प्रेम मिळाले.

तेजश्रीने आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे. 'बबलू बॅचलर' या हिंदी चित्रपटामध्ये देखील तेजश्रीने काम केले. तेजश्रीने नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने मुंडवळ्या बांधून नवरीच्या वेशातील फोटो शेयर केला आहे.

तिच्या या फोटोमुळे आता चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. तेव्हा जाणून घेऊया नेमकं काय आहे हे प्रकरण..

तेजश्री गेली 15 वर्षांहून अधिक काळ मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. आजवर तिने अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केले आहे. तेजश्री लवकरच तिच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा करणार आहे. मात्र त्याआधी तिनं एक पोस्ट शेअर करत सर्वांना मोठा धक्काच दिला आहे.

या पोस्ट मधील तिचा फोटो पाहून वाटेल की तिचं लग्न झालं की काय पण तसं नाहीय. हा फोटो 12 वर्षांपूर्वीचा आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांच्या सोबतचा हा फोटो असून तिने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

तेजश्रीनं डॉ. प्रकाश बाबा आमटे या सिनेमात डॉ. मंदाकिनी आमटे यांची भूमिका केली होती. तिनं तरूण वयातील मंदाकिनी आमटे साकारली होत्या. याच सिनेमात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी डॉ. बाबा आमटे यांची भूमिका साकारली होती. तेव्हाचा हा फोटो आहे.

आज अनेक वर्षांनी ते सिनेमाच्या अनेक वर्षांनी तेजश्री आणि डॉ. मोहन आगाशे पुन्हा एकत्र आले आहेत. लवकरच ते एका नव्या प्रोजेक्ट मध्ये दिसणार आहेत. बारा वर्षापूर्वीचा आणि आताचा असे दोन्ही फोटो शेयर करत तेजश्रीनं लिहिलंय, '12 वर्षांपूर्वीचा फोटो आणि 12 वर्षांनंतर त्याचं रिक्रेअशन. इतक्या वर्षांनी पुन्हा योग आला. पण तितकंच भारी फिलिंग आहे मोहन काका. आयुष्याच्या प्रवासात अनेक माणसं भेटतात त्यातील काहीच शेवटपर्यंत राहतात. माझ्या पाठिशी कायम असल्याबद्दल तुमचे खूप आभार मोहन काका.' अशी ही पोस्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT