adipurush box office collection day 3 prabahs, kriti sanon saif ali khan om raut  Esakal
मनोरंजन

Adipurush BO Day 3: पब्लिक वादात व्यस्त 'आदिपुरुष'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन मात्र मस्त!

Vaishali Patil

Adipurush box office collection Day 3: गेल्या अनेक दिवसांपासून प्रभास आणि क्रिती सॅनन स्टारर चित्रपट 'आदिपुरुष' चे चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट 16 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित तर झाला मात्र याचित्रपटामुळे अनेकांच्या अपेक्षा भंग झाल्या. प्रतिक्षा करणाऱ्या चाहत्यांचा एक वर्ग या चित्रपटावर प्रचंड नाराज झाला.

सगळीकडून चित्रपटावर टिका केली जात आहे. चित्रपटातील कलाकारांचे लूक असो किंवा त्यांचे डायलॉग प्रेक्षक या चित्रपटावर प्रेक्षक प्रंचड भडकले आहेत. त्यातच निर्मात्यांनी आता नमतं घेतल आणि चित्रपटातील डायलॉग बदलण्यात येईल असं देखील सांगितलं आहे.

वादविवाद राहिला एका बाजूला मात्र प्रभासच्या चाहत्यांना हा चित्रपट कमालिचा आवडला. या वादाचा आणि विरोधाचा चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर फारसा परिणाम झालेला दिसत नाही.

मात्र, असे असतानाही या चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. चित्रपटातील संवादांमध्येही अपशब्द वापरण्यात आल्याचे लोकांचे म्हणणे आहे. या सगळ्यात आता चित्रपटाची दुसऱ्या दिवसाची कमाई समोर आली आहे.

या चित्रपटाने पहिल्या दिवशी बंपर कमाई केली. जगभरात 150 कोटींचे कलेक्शन केले तर भारतात पहिल्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन 86 कोटी होते. 'आदिपुरुष'ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 65 कोटींचा गल्ला जमवला आहे.

आता रविवारी म्हणजेच रिलिजच्या तिसऱ्या दिवशी चित्रपटाने किती कोटींची कमाई केली याचे आकडे समोर आले आहेत. चित्रपटाने शनिवारच्या तुलनेत रविवारी 2.68 टक्के अधिक कमाई केली आहे.

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, तिसऱ्या दिवशी आदिपुरुष चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये कमालिची वाढ झाली असून चित्रपटाने 67 कोटींची कमाई केली आहे. या सुरुवातीच्या आकडेवारीवर विश्वास ठेवला तर, या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर तीन दिवसांत 219 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

आदिपुरुषने वादात असतांनाही अनेक मोठमोठ्या चित्रपटाचे रेकॉर्ड मोडित काढले आहेत . शाहरुख खानचा चित्रपट 'पठाण' हा 2023 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता मात्र, 'आदिपुरुष'ने येताच पठाणला मागे टाकले.

एकीकडे 'पठाण'ने पहिल्या तीन दिवसांत 166.75 कोटींची कमाई केली आहे. दुसरीकडे, 'आदिपुरुष'ने पहिल्या तीन दिवसांत २०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT