After 'South', now 'Punjabi' movies crack the box office collection
After 'South', now 'Punjabi' movies crack the box office collection Google
मनोरंजन

बॉलीवूड तोंडावर आपटलं; 'साऊथ' नंतर आता 'पंजाबी' सिनेमांचा बॉक्सऑफिसवर कब्जा

प्रणाली मोरे

कोरोना(Corona) काळात खूप गोष्टी बदलल्या आहेत,तसंच बॉलीवूडमध्येही खूप उलथापालथ झाली आहे. कधी काळी हिंदी सिनेमांसमोर दुसऱ्या इंडस्ट्रीच्या सिनेमे खूप लवकर हार मानायचे. पण आता परिस्थिती उलटी आहे. कोरोनानंतर प्रदर्शित झालेले बॉलीवूडचे (Bollywood) काही एक-दोन सिनेमे सोडले तर बाकी सगळेच सिनेमे दणकून आपटले आहेत. सध्या ईस्ट आणि वेस्ट साऊथच्या सिनेमांची क्रेझ आहे.आणि उरली सुरली कसर मराठी(Marathi Movie) आणि पंजाबी(Punjabi Movie) सिनेमांनी भरुन काढली आहे. साऊथ आणि पंजाबी सिनेमे बॉक्सऑफिसवर बंपर कमाई करून आश्चर्याचे धक्के देत आहेत.

हिंदी सिनेमा थिएटरमध्ये किंवा ओटीटी कुठेही प्रदर्शित केला तरी दोन्हीकडूनही गूडन्यूज देताना दिसत नाही. २०२२ मध्ये 'गंगूबाई काठियावाडी', 'द काश्मिर फाईल्स' हे दोन हिंदी सिनेमे सोडले तर 'पुष्पा', 'आरआरआर','केजीएफ चॅप्टर २' या दाक्षिणात्य सिनेमांपुढे इतर सगळ्याच हिंदी सिनेमांनी नांगी टाकल्याचं चित्र दिसून आलं. 'झुंड','अटॅक','बच्चन पांडे','जर्सी' ते अगदी आता प्रदर्शित झालेल्या 'जयेशभाई जोरदार' या सर्व सिनेमांचा त्यात समावेश आहे.

'जयेशभाई जोरदार' अजूनही बॉक्सऑफिसवर कमाई करण्यासाठी धडपडत आहे. या सिनेमानं वीकेंडला ओपनिंग करताना १२ करोड मोठ्या मुश्किलीनं कमावले आहेत. तर तिकडे साऊथ,पंजाबी आणि मराठी सिनेमे रेकॉर्डवर रेकॉर्ड करीत सुटले आहेत. चला आता थोडं सविस्तर जाणून घेऊया बॉलीवूडला दुसऱ्या इंडस्ट्रीतील नेमकं कोणत्या सिनेमांनी पाणी पाजलं आहे. आणि त्या हिट सिनेमांचं एकूण कलेक्शन किती..

KGF Chapter 2

साऊथ सुपरस्टार यशचा सिनेमा 'केजीएफ चॅप्टर २'(KGF Chapter 2) ची बॉक्सऑफिसवर घोडदौड सुरुच आहे. सिनेमाच्या हिंदी व्हर्जननं पाचव्या आठवड्यातही आपली कमाई सुरु ठेवलीय. भारतभरात सिनेमानं ४२७.०५ करोडचं कलेक्शन केलं आहे. तर सिनेमाचं जगभरातलं कलेक्शन १२०० करोडचा टप्पा पार करुन पुढे गेलं आहे.

धर्मवीर

मराठी सिनेमा धर्मवीर(Dharmaveer) देखील खूप चर्चेत आहे. सिनेमाच्या बॉक्सऑफिस कलेक्शनमध्ये दिवसागणिक वाढ दिसत आहे. या सिनेमाची समिक्षकांनी देखील भरपूर प्रशंसा केली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी धर्मवीर नं २.०५ करोडचं खातं खोललं होतं. सिनेमाचे वीकेंडचं ओपनिंग जवळपास ९.०८ करोड पर्यंत पोहोचलं आहे. महाराष्ट्रात या सिनेमाविषयी भरपूर चर्चा आणि उत्साह दिसून आला. प्रेक्षकांनी तर या सिनेमाला 'मास्टरपीस' म्हणून संबोधलं आहे.

Sarkaru Vaari paata

गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेला महेश बाबूचा Sarkaru Vaari paata नं देखील दमदार कमाई केली आहे. सिनेमानं जगभरात १५० करोडचं कलेक्शन केलं आहे. आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये सिनेमानं ४ दिवसांत १०८.१२ करोड कमावले आहेत.

Sanukan Saunkne

पंजाबी सिनेमा Sanukan Saunkne ची प्रदर्शनाआधी पासूनच चर्चा होती. एमी विर्क,निमरत खैरा आणि सरगुनु मेहता यांच्या दमदार अभिनयानं सजलेल्या या सिनेमानं कमाईचा एक रेकॉर्ड सेट केलाय. हा एक रोमॅंटिक कॉमेडी सिनेमा असून या सिनेमाला अमरजित सिंगनं दिग्दर्शित केलं आहे. एका जोडप्याची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. त्यांच्या लग्नाला ८ वर्ष होऊनही त्यांना मुल होत नसतं. आपल्या सासूच्या सांगण्यावर बायको नवऱ्याला आपल्या बहिणीशी लग्न करण्याची जबरदस्ती करते. आणि बस्स,तिथुन पुढे जे घडतं ते नुसतं धम्माल आहे. या सिनेमानं २.२५ करोड ओपनिंगलाच कमावले होते. जगभरात या सिनेमानं केवळ तीन दिवसात १९ करोड कमावले आहेत. आता सर्व म्हणत आहेत,असं जर दुसऱ्या इंडस्ट्रीतील सिनेमांनी आपला धुमधडाका सुरूच ठेवला तर बॉलीवूडची मोठी नामुष्की अटळ आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT