SS Rajamouli Esakal
मनोरंजन

SS Rajamouli: मी भारतातला हुकूमशहा पण... ' राजामौली पाहतोय हॉलिवूडचं स्वप्न

क्रिटिक चॉईस अवॉर्ड जिंकल्यानंतर दिग्गज दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग आणि जेम्स कॅमेरॉन यांचीही भेट घेतली होती.

Vaishali Patil

भारतातील सर्वात प्रभावी दिग्दर्शक म्हणून आता एस एस राजामौलींच्या नावाचा उल्लेख केला जातो आहे. त्यांनी केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही भारताच नाव मोठं केलं आहे. त्याच्या मख्खी, बाहुबली आणि आता आरआरआर सारख्या चित्रपटांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. (SS Rajamouli on Hollywood Debut)

आरआरआरने रेकॉर्डब्रेक कमाई तर केलीच आणि आता हा चित्रपट ऑस्कर मध्येही गाजतोय. या चित्रपटाला गोल्डन ग्लोब अवॉर्ड आणि क्रिटिक्स चॉइस अवॉर्डही मिळाला. त्यामुळे राजामौली हे किती कर्तृत्ववान दिग्दर्शक आहे काही वेगळं सांगायची गरज नाही. RRR च्या प्रचंड यशानंतर एसएस राजामौली यांना आता हॉलिवूडमध्ये काम करायचे आहे.

दक्षिणेचे दिग्दर्शक एसएस राजामौली आणि त्यांचा चित्रपट RRR सध्या जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. गोल्डन ग्लोब अवॉर्ड आणि क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड जिंकल्यानंतर त्याला आता हॉलिवूड चित्रपटांमध्ये हात आजमावायचा आहे. राजामौली यांनी गेल्या आठवड्यात क्रिटिक चॉईस अवॉर्ड जिंकल्यानंतर दिग्गज दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग आणि जेम्स कॅमेरॉन यांचीही भेट घेतली आणि दोघांनीही आरआरआरचं तोंड भरुन कौतुक केले.

आरआरआर चित्रपटातील अभिनेत ज्युनियर NTR आणि राम चरण यांना हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्याबद्दल विचारण्यात आले. आता या विषयावर दिग्दर्शक एसएस राजामौली यांनीही चर्चा केली. एका अमेरिकन पॉडकास्टशी बोलताना राजामौली म्हणाले, "हॉलीवूडमध्ये चित्रपट बनवणे हे जगभरातील प्रत्येक चित्रपट दिग्दर्शकाचे स्वप्न असते. मी यापेक्षा वेगळा नाही. मी प्रयोग करण्यास तयार आहे." अशी प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा

राजामौली पुढे म्हणाले की, सध्या ते हॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करण्याबाबत ते थोडे गोंधळलात आहे. ते म्हणाले की, "आता पुढे काय करायचे या विचाराने मी थोडा गोंधळात पडलो आहे. मात्र, या बद्दल बोलतांना पुढे ते म्हणाले की, 'भारताबद्दल बोलायचं झालं तर मी तिथला हुकूमशहा आहे. चित्रपट कसा बनवायचा हे तिथलं कोणीही मला सांगू शकत नाही. कदाचित मी माझा पहिला प्रोजेक्ट (हॉलिवूड) एखाद्यासोबत करेन."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

Dombivali News : आमदार राजेश मोरे यांनी पलावा पुलाचे उद्घाटन केले आणि पूल बंद झाला

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

SCROLL FOR NEXT