riteish deshmukh, genelia deshmukh, ved, ved movie watch online, Riteish - Genelia Deshmukh Viral Video  SAKAL
मनोरंजन

Riteish - Genelia Deshmukh: 'वेड'च्या यशानंतर रितेश - जिनीलीयाची न्यू यॉर्कवारी.. ओपन बसमध्ये झाले रोमँटिक!

या व्हिडिओत हे दोघे न्यू यॉर्कला गेले आहेत

Devendra Jadhav

Riteish - Genelia Deshmukh Viral Video News: सगळ्या महाराष्ट्राला 'वेड' (Ved) लावणारी जोडी म्हणजे रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख. ३१ डिसेंबर २०२२ ला आलेल्या वेड सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ७० कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला.

रितेश आणि जिनिलिया हे अनेकदा रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. या दोघांचा एक रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

(After the success of ved, Riteish - Genelia Deshmukh New York trip.. couple turn romantic in an open bus)

हेही वाचा: शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

या व्हिडिओत हे दोघे न्यू यॉर्कला गेले आहेत. न्यू यॉर्क मध्ये ओपन बसमध्ये दोघे प्रवास करत आहेत. London नहीं New York ही सही !!! खुली Bus पे… ये गाना तो बनता है! असं कॅप्शन रितेशने या व्हिडिओला दिलंय.

या दोघांनी दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे सिनेमातील हो गया है तुझको तो प्यार सजना गाण्याच्या व्हिडिओवर रोमँटिक डान्स केलाय.

रितेश जिनिलियाला भटकंतीची आवड असून दोघे जगभरात प्रवास करत असतात. दोघांचे रील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

रितेश देशमुख - जिनिलिया देशमुख यांच्या वेड सिनेमाची जादू अजूनही कायम आहे. वेड प्रदर्शित होऊन तब्बल तीन महिन्यांचा कालावधी लोटला.

आता वेडच्या OTT रिलीजची सर्व प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

वेडने दिवसेंदिवस कमाईचे नवीन आकडे मोडले. काहीच दिवसांपूर्वी वेडने थिएटरमध्ये ५० दिवस केले. वेडने आतापर्यंत ७४ कोटींचा टप्पा पूर्ण केलाय.

जगभरात वेडने ७४ कोटींपेक्षा जास्त कमाई केली असून भारतात वेडने ६०. ६७ कोटींची कमाई केली आहे.

अशाप्रकारे सैराटननंतर वेड सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरल्याची शक्यता आहे. वेड निमित्ताने मराठी सिनेमांची नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात झालीय.

वेड सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी सिनेमाला भरभरून प्रतिसाद दिला. महाराष्ट्रातील ठिकठिकाणी वेडने हाउसफुल्लची पाटी झळकवली.

वेडला मिळणार प्रतिसाद बघून रितेशने वेड तुझा या गाण्याचं नवीन व्हर्जन आणि काही प्रसंग समाविष्ट करून वेडची नवीन कॉपी थिएटरमध्ये रिलीज करण्यात आली.

त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांनी वेड पाहायला गर्दी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

Pachod Accident : हळदीचा कार्यक्रम उरकून घरी परतणाऱ्या मावसभावाचा दूचाकी धडकून मृत्यू

Marriage Rules: महाराष्ट्रात लग्नाचे नियम बदलणार! लग्नपत्रिकेत वर-वधुची जन्मतारीख बंधनकारक होणार? बालहक्क आयोगाची मोठी शिफारस

SCROLL FOR NEXT