Aishwarya Rai Pregnant News
Aishwarya Rai Pregnant News Aishwarya Rai Pregnant News
मनोरंजन

Aishwarya Rai Pregnant : ऐश्वर्या दुसऱ्यांदा गर्भवती? ओव्हरसाईज ड्रेसमध्ये दिसली

सकाळ डिजिटल टीम

Aishwarya Rai Pregnant News बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai) लवकरच पोन्नियिन सेल्वन चित्रपटात दिसणार आहे. ऐश्वर्या सध्या चित्रपटाच्या प्रमोशन आणि इतर कामांमध्ये व्यस्त आहे. अलीकडे पापाराझींनी तिला पाहिले तेव्हा ती मोठ्या ओव्हरसाईज ड्रेसमध्ये दिसली. याआधीही ती एकदा जड सूटमध्ये दुपट्ट्याने पोट झाकताना दिसली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्सने ऐश्वर्या राय बच्चनच्या प्रेग्नेंसीबद्दल (Pregnant) अंदाज बांधायला सुरुवात केली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी कमेंट केली आहे की ऐश्वर्या राय दुसऱ्यांदा प्रेग्नंट (Pregnant) आहे का? लोकांनी विचारले आहे की ऐश्वर्या राय तिचा बेबी बंप दुपट्टा आणि ओव्हरसाईज ड्रेसमधून लपवण्याचा प्रयत्न करीत आहे का? ऐश्वर्या रायचे (Aishwarya Rai) लग्न अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनसोबत (Abhishek Bachchan) २००७ मध्ये झाले होते.

लग्नाच्या चार वर्षांनंतर दोघांना आराध्या नावाची मुलगी झाली. आराध्या बच्चन आता १० वर्षांची आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या अटकळानुसार, अभिषेक आणि ऐश्वर्याने त्यांच्या कुटुंबाला पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. तसेच बच्चन कुटुंबीयांनीही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

पोन्नियिन सेल्वनची चाहत्यांना प्रतीक्षा

ऐश्वर्या राय बच्चनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच मणिरत्नमच्या पोन्नियिन सेल्वन या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचे प्रोमो व्हिडिओ खूपच आकर्षक आहेत आणि प्रेक्षक या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत. चित्रपटात ऐश्वर्या राय सुंदर दिसत असून आता लोक चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT