Ajay Devgan And Salman Khan Google
मनोरंजन

अजय देवगण-सलमान खानची फोनवर झाली चर्चा, मोठा निर्णय घेतल्याचा खुलासा

अजय देवगणचा Runway 34 लवकरच भेटीस येत आहे. या निमित्तानं दिलेल्या मुलाखतीत अजयनं 'या' महत्त्वाच्या फोनकॉलविषयी सांगितलं आहे.

प्रणाली मोरे

अजय देवगणचा(Ajay Devgan) 'Runway 34' सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनाची सगळेच आतुरतेने वाट पाहत होते. पहिल्यांदा अजय देवगण या सिनेमाच्या माध्यमातून पायलटची भूमिका साकारणार आहे. या सिनेमामध्ये अजयनं केवळ अभिनय केला नाही,तर निर्माता आणि दिग्दर्शकाचीही भूमिका बजावली आहे. आतापर्यंत बॉलीवूडमध्ये ईदच्या दिवशी सिनेमा प्रदर्शित केला जातो तो फक्त सलमान खानचा(Salman Khan). गेली अनेक वर्ष सर्व बॉलीवूडकर हा नियम पाळताना दिसत आहेत. पण आता सलमान खानच्या जागी अजय देवगण ईदच्या दिवशी आपला सिनेमा घेऊन आला आहे. आता सलमान खान नाही तर अजय देवगणं चाहत्यांना ईदी देणार आहे. आणि याच मुद्दयावर दोघांमध्ये एक महत्त्वाचा फोनकॉल झाला असून मोठा निर्णयही घेण्यात आला आहे.टट

अजय देवगणनं पिंकव्हिलाशी बोलतना सांगितलं आहे की, आपला सिनेमा ईदच्या दिवशी प्रदर्शित करण्याचा काहीच प्लॅन नव्हता. तो म्हणाला,'Runway 34' हा सिनेमा ईदच्या दिवशी प्रदर्शित करायचा विचार नव्हता. आम्हाला फक्त तारिख ती हवी होती,नेमकी ईद योगायोगाने त्या दिवशी आली. पण मी हा योग जुळून आला म्हणून खूश आहे. मी जेव्हा सिनेमाची अनाऊंसमेंट केली तेव्हा मला माहित नव्हतं की,तो ईदच्या आठवड्यात प्रदर्शित होईल. पण जसं मला कळलं की ज्या दिवशी सिनेमा प्रदर्शित होतोय त्या दिवशी ईद आहे तेव्हा मी लगोलग सलमानला कॉल केला.

अजय पुढे म्हणाला,''जेव्हा मी सलमानला सांगितलं की,माझा Runway 34 सिनेमा ईदच्या दिवशी प्रदर्शित होतोय,तुला काही प्रॉब्लेम नाही नं?'' यावर सलमान म्हणाला,''काही हरकत नाही,मी त्या आठवड्यात येत नाहीय माझा सिनेमा घेऊन,मी पुढच्या वर्षी ईदच्या दिवशी प्रदर्शित करतोय माझा सिनेमा''. सिनेमा सणांच्या दिवशी प्रदर्शित करण्यावर अजय म्हणाला,''सणांच्या निमित्तानं आलेल्या सुट्ट्या बॉक्सऑफिस कलेक्शनला मदत करतात. लोकं बाहेर जाणं पसंत करतात. ते सिनेमा पाहण्याला पसंती देतात. रमजान नंतर ईद येते ,लोकं सेलिब्रेशन मूडमध्ये असतात. आणि सिनेमाचं सेलिब्रेशनसोबत मोठं कनेक्शन आहे''.

तुमच्या माहितीसाठी सांगतो इथे की,जेव्हा अजयने सिनेमाच्या प्रदर्शनाची तारिख अनाऊन्स केली तेव्हा सलमाननंही त्यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यानं सोशल मीडियावर लिहिलं होतं,''माझ्याकडं सिनेमा तयार नव्हता तेव्हा मी माझा भावासारखा मित्र अजय देवगणला विनंती केली की तो त्याचा सिनेमा ईदच्या दिवशी प्रदर्शित करेल का आणि ईदी देईल का? चला,या ईदला आपण Runway 34 पाहूया''.

Runway 34 विषयी बोलायचं झालं तर अजयसोबत अमिताभ बच्चन,रकुलप्रीत सिंग आणि बोमन ईराणी मुख्य भूमिकेत आहेत. २९ एप्रिल रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच दिवशी टायगर श्रॉफचा 'हिरोपंती २' हा सिनेमा देखील या दिवशीच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात टायगर सोबत तारा सुतारिया महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

SCROLL FOR NEXT