ajay purkar, pawankhind SAKAL
मनोरंजन

विशाळगडाच्या पायथ्याशी बांधलेल्या घराबद्दल Ajay Purkar यांनी घेतला मोठा निर्णय

आई बाबांचं घर हे अजय पुरकर यांचं स्वप्न होतं

Devendra Jadhav

Ajay Purkar News: पावनखिंड, फर्जंद, फत्तेशीकस्त, शेर शिवराज अशा अनेक सिनेमांमधून ऐतिहासिक भूमिका साकारणारे अभिनेते अजय पुरकर सर्वांचे आवडते अभिनेते. पावनखिंड सिनेमात अजय पुरकर यांनी साकारलेली बाजीप्रभू देशपांडे यांची भुमीका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

अजय पुरकर यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी स्वतःचं एक घर बांधलं. आता अजय पुरकर यांनी या घरासंबंधी महत्वाची माहिती दिली आहे.

(Ajay Purkar took a big decision about the house built at the base of Vishalgad)

अजय पुरकर यांनी पावनखिंड सिनेमात साकारलेली बाजीप्रभू देशपांडेची भूमिका प्रचंड गाजली. ज्या भूमीत पावनखिंडीची लढाई झाली त्याच भूमीत आपलं घर असावं अशी अजय पुरकर यांची इच्छा होती आणि जून २०२२ ला अजय पुरकर यांनी या भूमीत स्वतःचं घर बांधलं.

या घराला अजय पुरकर यांनी 'आई - बाबांचं घर' असं नाव दिलं. आता याच घराचं अजय पुरकर यांनी व्यवसायात रूपांतर केलं.

आई बाबांचं घर हे अजय पुरकर यांचं स्वप्न होतं. या घराचं खूप कौतुक झालं. आता अजय पुरकर यांनी हे घर सर्वांसाठी खुलं केलेलं आहे.

अजय पुरकर यांनी आई बाबांचं घर नावाने एक वेबसाईट बनवली आहे. www.aaibabanchaghar.com या नावाने हि वेबसाईट असून यावर सर्व माहिती मिळू शकते. विशाळगडाजवळ आंबा घाटच्या येथे हे घर आहे.

या घराच्या आसपास निसर्गाचं सानिध्य आहे. याशिवाय लोकांना राहण्यासाठी अजय पुरकर यांनी राहण्या - खाण्याची आणि जेवणाची सोय केलीय. याशिवाय सिनियर सिटीझन लोकांना इथे येण्यासाठी रोड टू रोड पीक आणि ड्रॉपची सोय अजय पुरकर यांनी ठेवली आहे.

अजय पुरकर यांची स्वतःची गाडी आणि ड्रायव्हर याठिकाणी लोकांना घरपोच आणून सोडू शकतो. अशाप्रकारे अत्यंत हुशारीने अजय पुरकर यांनी राहत्या घराचं बिझनेसमध्ये रूपांतर केलं.

अजय पुरकर लवकरच शिवराज अष्टक मधील पुढचा सिनेमा म्हणजे सुभेदार या सिनेमात झळकणार आहेत. नरवीर तान्हाजी मालुसारे यांची भूमिका अजय पुरकर साकारणार आहेत. जून २०२३ ला दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित सुभेदार हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Latest Maharashtra News Updates : सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भागवत कांबळे रंगेहाथ अडकले

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT