Akshay Kumar as'Prithviraj' Google
मनोरंजन

पृथ्वीराज चौहान राजपूत की गुर्जर राजा? अक्षयचा 'पृथ्वीराज' सापडला वादात

३ जून,२०२२ रोजी अक्षय कुमारचा 'पृथ्वीराज' सिनेमा जगभरात प्रदर्शित होत आहे.

प्रणाली मोरे

गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार(Akshay Kumar) मुख्य भूमिका करीत असलेला 'पृथ्वीराज'(Prithviraj) सिनेमा अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. आणि सिनेमा पुढील महिन्यात ३ जून रोजी प्रदर्शित होत आहे. भारतातील शेवटचे हिंदू राजा पृथ्वीराज चौहान यांच्यावर बनलेला हा सिनेमा आता प्रदर्शनाआधीच वादात सापडला आहे. या सिनेमावर गुर्जर समाजाच्या संघटनेनं आक्षेप घेतला आहे. संघटनेचा दावा आहे की, १२ व्या दशकात होऊन गेलेले महाराज पृथ्वीराज चौहान हे राजपूत नसून गुर्जर समाजाचे होते. संघटनेनं मागणी केली आहे की सिनेमात पृथ्वीराज चौहान हे गुर्जर राजा होते असा उल्लेख करावा.

पृथ्वीराज चौहान यांचं साम्राज्य उत्तर भारत आणि राजस्थानमध्ये पसरलं होतं. त्यांच्या राज्याची राजधानी अजमेर होती. आता अखिल भारतीय वीर गुर्जर समाजानं दावा केला आहे की,पृथ्वीराज चौहान हे गुर्जर राजा होते. संघटनेचे मुख्य वीरेंद्र विक्रेम यांच्या म्हणण्यानुसार पृथ्वीराज रास भाग १ मध्ये पृथ्वीराज चौहान यांचे वडील सोमेश्वर यांचा गुर्जर म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. ते म्हणाले,''असे कितीतरी ऐतिहासिक दाखले आहेत ज्यावरुन स्पष्ट होईल की पृथ्वीराज गुर्जर होते. याच दाखल्यांच्या आधारावर सिनेमाच्या निर्मात्यांकडे आमची मागणी आहे की,'पृथ्वीराज' या सिनेमात राजा पृथ्वीराज हे राजपूत नाही तर गुर्जर राजा होते असा उल्लेख व्हावा''.

गुर्जर संघटनेचे राज्याध्यक्ष मनीष भारगद यांनी म्हटलं आहे की,'' त्यांच्या संघटनेनं गेल्या वर्षी यासंदर्भात सिनेमाच्या निर्मात्यांची भेट घेतली होती. आणि त्यांच्यासमोर यासंदर्भातले अनेक ऐतिहासिक पुरावे सादर केले होते. आणि याच भेटीत सिनेमात योग्य प्रकारे राजा पृथ्वीराज यांचा उल्लेख व्हावा अशी मागणीही केली होती. त्यावेळी आम्हाला निर्मात्यांनी योग्य बदल केले जातील असं आश्वासन दिलं होतं. आमच्या गुर्जर समाजाविरोधात कुठलाही उल्लेख नसेल असे सांगून आम्हाला आश्वस्त केलं होतं. आता सिनेमा प्रदर्शित होतोय म्हणून आम्ही पुन्हा निर्मात्यांना आमच्या मागणीची आठवण करून देत आहोत. आणि जर आमच्या मागणीनुसार सिनेमात बदल कले नसतील तर सिनेमा प्रदर्शित होण्यावर आमचा आक्षेप आहे''. यासंदर्भात अद्याप राजपूत समाजानं आपली बाजू समोर आणलेली नाही.

अक्षय कुमार व्यतिरिक्त 'पृथ्वीराज' या सिनेमात संजय दत्त,सौनू सूद, आशुतोष राणा आणि मानव विज असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमातून माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे. 'पृथ्वीराज/ सिनेमाचं दिग्दर्शन डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup, IND vs PAK: भारताकडून गोलचा पाऊस अन् पाकिस्तान आऊट! दणदणीत विजयासह हरमनप्रीतचा संघ पुढच्या फेरीत प्रवेश

Pune Crime: पुणं हादरलं! डोक्यात हातोडा घालून मित्रांनी काढला मित्राचा काटा; विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग

Marathi News Live Updates : जातनिहाय जनगणनेच्या बाबतीत अशा प्रकारची फसवणूक का केली जात आहे? - के. सी. वेणुगोपाल

Yamaha RayZR 125 ला नवा लूक! नवीन रंगांसह मिळणार TFT डिस्प्ले आणि नेव्हिगेशन स्मार्ट फीचर्सचा फूल धमाका

Jintur Rescue News: तीन वर्षांचा चिमुकला १५ फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला; दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर

SCROLL FOR NEXT