Alia Bhatt and Ranbir Kapoor announce pregnancy; Mahesh Bhatt reacts  Google
मनोरंजन

Alia Bhatt Pregnancy: वडील महेश भट्ट यांची पहिली प्रतिक्रिया...

आलियानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर करीत,'Our Baby...coming soon' असं कॅप्शन देत पोस्ट शेअर केली आहे.

प्रणाली मोरे

आजचा दिवस कपूर आणि भट्ट कुटुंबासाठी मोठा आहे. कारण आजच आलिया(AliaBhatt)-रणबीरनं(Ranbir Kapoor) सोशल मीडियावरनं ते आई-बाबा होणार असल्याची बातमी दिली आहे. ही पोस्ट पडते न पडते तोच यावर प्रतिक्रियांचा नुसता पाऊस पडू लागला आहे. आलिया-रणबीरच्या चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करतानाच काही हुशार नेटकऱ्यांनी मात्र दोघांना या बातमीवर चांगलच सुनावलं आहे. प्रमोशनसाठी स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याचा गैरवापर करत असल्याचं देखील काहींनी म्हटलं आहे. पण आता या बातमीवर दस्तुरखुद्द आलियाच्या वडलांनी म्हणजे ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट्ट यांनी प्रतिक्रिया दिलीय म्हटल्यावर बातमी खरी वाटू लागलीय.(Alia Bhatt and Ranbir Kapoor announce pregnancy; Mahesh Bhatt reacts)

आलियानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती हॉस्पिटलमध्ये एका बेडवर झोपली आहे,बाजूला पाठमोरा रणबीर तिच्याजवळ बसलाय,अन् जवळच्या(अल्ट्रासाऊन्ड) मॉनिटरच्या स्क्रिनवर हार्ट इमोजी दिसत आहे. या क्यूट फोटोला आलियानं कॅप्शन दिलंय,''Our Baby...coming soon''.आता या आलियाच्या बातमीवर तिच्या बाबांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. काय म्हणाले आहेत महेश भट्ट?

महेश भट्ट यांनी एका इंग्रजी वेबासाईटला दिलेल्या मुलाखतीत आलियाच्या या गूडन्यूजवर आनंद व्यक्त करताना कुटुंबात येणाऱ्या नव्या सदस्याचं स्वागतही केलं आहे. महेश भट्ट म्हणाले आहेत,''ओ माझ्या बाळाला आता बाळ होतंय. मी रणबीर-आलियासाठी खूप खूश आहे. आमचं कुटुंब वाढतंय. आणि आता मला सुद्धा प्रमोशन मिळालं आहे. आयुष्यातील त्या नव्या नात्यासाठी,भूमिकेसाठी,जबाबदारीसाठी आता मला स्वतःला तयार करायला हवं. मी आता आजोबा होणार. आलियाच्या लग्नानंतर दोनच महिन्यांत मिळालेली ही बातमी खूप आनंद देणारी आहे''.

आलिया-रणबीर यांनी १४ एप्रिल,२०२२ रोजी काही मोजक्याच नातेवाईक आणि मित्र-परिवाराच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली होती. सोशल मीडियावर त्यांच्या लग्न सोहळ्यातील फोटो जोरदार व्हायरल झाले होते. रणबीरनं खरंतर 'शमशेरा' सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं आयोजित एका कार्यक्रमात बाळाच्या आगमनाची हिंट दिली होती अशी चर्चा आता सुरु झाली आहे. जेव्हा त्याला फॅमिली प्लॅनिंग विषयी विचारलं गेलं होतं तेव्हा तो म्हणाला होता,''मला खूप काम करायचं आहे,माझं कुटुंब बनवायचं आहे,त्यांच्यासाठी मला काम करायचंय. आधी मी स्वतःसाठी काम करायचो. पण आता कुटुंबासाठी करेन,खूप काम करेन''. आता आलियाच्या 'गूडन्यूज' पोस्टनंतर रणबीरचं हे वक्तव्य देखील जोरदार चर्चेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शिवाजीनगर मेट्रो' स्थानकाचे नाव बदलण्यावरून वाद; फडणवीसांचा तीव्र विरोध, कर्नाटकचे CM म्हणाले, 'आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे...'

Shivaji University : शिवाजी विद्यापीठाच्या सत्तर टक्के प्रश्नपत्रिका ‘ऑनलाईन सेट’, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर

Chhagan Bhujbal : ‘ओबीसीतूनच आरक्षण हवे, तर इतर सर्व आरक्षण सोडणार का?’ भुजबळांचे आव्हान

Latest Marathi News Updates : विंचूर उपबाजार आवारात कांद्याला कमी भाव, संतप्त शेतकऱ्यांचा रस्ता रोको आंदोलन

वरिष्ठ गाढवाला घोडा म्हणाले तर तुम्हीही घोडाच म्हणा; सरकारी कामाबाबत गडकरींचं विधान

SCROLL FOR NEXT