Alia Bhatt delivery childhood Video Viral on Social Media  Instagram
मनोरंजन

Alia Bhatt: डिलीव्हरीनंतर आलिया भट्टचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, पाहून लोक म्हणू लागलेयत...

आलियानं आपल्या मुलीला जन्म दिल्यानंतर आता चाहते सोशल मीडियावर तिच्यासंबंधित अनेक व्हिडीओ सर्च करताना दिसत आहेत. त्यातल्याच एका व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

प्रणाली मोरे

Alia Bhatt: बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टने एका क्युट मुलीला जन्म दिला आहे. अभिनेत्रीनं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही गूड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली अन् सगळीकडे एकच जल्लोष सुरू झाला. आलिया भट्टच्या डिलीव्हरीनंतर आता चाहत्यांना अभिनेत्रीच्या मुलीचा फोटो पहायचा आहे. यादरम्यान आता आलिया भट्टच्या लहानपणीचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Alia Bhatt delivery childhood Video Viral on Social Media)

आलिया भट्टच्या लहानपणीचे फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहते आता तिची मुलगी कशी दिसत असेल याचा अंदाज लावताना दिसत आहेत. आलिया आणि रणबीरला लहान मुलं खूप आवडतात याविषयी त्यांच्या बोलण्यातून अनेकदा समोर आले आहे, रणबीर कपूरने तर मुलाखतीत हे देखील म्हटलं होतं की,''माझे गुडघे जोपर्यंत शाबूत आहेत, तोपर्यंत मला माझ्या मुलासोबत फुटबॉल खेळायचे आहे''.

तर आलिया भट्टनं एका टी.व्ही शो दरम्यान आपल्या मुलीचे नाव जाहीर केले होते. आलिया भट्टच्या डिलीव्हरीनंतर आता तिच्या लहानपणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये छोटी आलिया आपल्या वडीलांच्या पोटावर बसून मस्ती करताना दिसत आहे. लहान आलियासोबत खेळताना महेश भट्ट कोणाशीतरी फोनवर बोलताना दिसत आहेत.

महेश भट्ट छोट्या आलियासोबत खेळताना तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. व्हिडीओ खूप जुना आहे पण आलिया भट्टच्या डिलीव्हरीनंतर चाहते याला सोशल मीडियावर शेअर करत लिहिताना दिसत आहेत की,'आलिया भट्टची मुलगी तिच्यासारखीच क्यूट असणार आहे'. आता पहायचं की आलिया भट्ट आपल्या मुलीचे फोटो शेअर करते की नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMCमध्ये शिंदेंचा भाजपला शह, शिवसेनेला मनसेचा पाठिंबा; महापौर कुणाचा होणार? श्रीकांत शिंदेंनी दिली माहिती

Wealth Report : बापरे! या 12 लोकांकडे जगातील अर्ध्या लोकांइतकी संपत्ती; भारतातून किती जणांचा समावेश?

Kolhapur Gaganbavda Road Accident : कोल्हापूर -गगनबावडा मार्गावर भीषण अपघात, कुटुंबाचा आधार असलेल्या २४ वर्षांचा सौरभचा मृत्यू..., मित्रही गंभीर

Latest Marathi News Live Update : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महायुतीची सत्ता स्थापन केली जाईल- श्रीकांत शिंदे

Ratnagiri Crime : जेवण करण्यासाठी घरी बोलावलं अन् जबरदस्तीने ठेवले शारीरिक संबंध; अल्पवयीन मुलगी सहा महिन्यांची राहिली गर्भवती

SCROLL FOR NEXT