Alia Bhatt discharged from hospital, returned home with baby girl Instagram
मनोरंजन

Alia Bhatt Discharged: हॉस्पिटलमधून घरी परतली आलिया, रणबीरच्या कुशीत चिमुकलीची पहिली झलक...

६ नोव्हेंबर २०२२ रोजी आलियानं बेबी गर्लला जन्म दिला आहे.

प्रणाली मोरे

Alia Bhatt Discharged: आई वडिल होणं हे आयुष्यातील वेगळंच सुख आहे, तो एक वेगळाच आनंद आहे आणि अनुभव आहे. आता हाच अनुभव आलिया भट्ट आणि रणबीर कपूर जगत आहे.

आलिया भट्टने मुलीला जन्म दिल्यापासून ती चर्चेत आहे. कपूर आणि भट्ट कुटुंबातही जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आलिया आणि रणबीरच्या मुलीची पहिली झलक पाहण्यासाठी त्यांचे चाहतेही आतुर आहेत. आलियाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

इंस्टाग्रामवर सर एचएन रिलायन्स हॉस्पिटलचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर आणि आलिया आपल्या बाळाला घरी घेऊन जात आहे.

रविवारी आलियाने बाळाला जन्म दिला. चार दिवसांनंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रणबीर आणि आलिया भट्ट आपल्या कपूर हाऊसमध्ये पोहोचले आहेत. तेआपल्या मुलीला कारमध्ये घेऊन येतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पप्पा रणबीरने आपल्या लहान बाळाला हातात धरलेले दिसत आहे, जी पूर्णपणे कपड्यांनी झाकलेली आहे.आणि आलियाच्या चेहऱ्यावर आई झाल्यानंतरची एक वेगळीच झलक पहायला मिळत आहे.

जेव्हा रणबीरने आपल्या मुलीला जन्मानंतर पहिल्यांदा आपल्या मिठीत घेतले तेव्हा तो भावूक झाला होता. आलिया आणि मुलीच्या स्वागतासाठी कपूर कुटुंबीयांनी घरी विशेष तयारी केली आहे.

आलिया भट्टला रविवारी सकाळी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि त्याच दिवशी तिने एका मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्माची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर करताना, आलियाने लिहिले, 'आमच्या आयुष्यातील सर्वात चांगली बातमी - आमचं बाळ जन्माला आलं आहे... आणि ती एक जादुई मुलगी आहे', या पोस्टसह आलियाने एक स्केच शेअर केला आहे. सिंहाचं कुटुंब. ज्यामध्ये सिंह त्याची पत्नी अर्थात सिंहिण आणि त्यांच्या मुलासह दिसत होता.

दीर्घकाळ डेटिंग केल्यानंतर, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी अखेर या वर्षी एप्रिलमध्ये त्यांच्या घरी फक्त त्यांचे कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली होती. आणि जुन मध्ये ती प्रेग्नंट असल्याची बातमी त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केली होती आणि आता त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. आलिया आणि रणबीर साठी हा आनंद वेगळाच असणार हे वेगळं सांगायला नकोच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT