after pregnancy what will happen about alia's career
after pregnancy what will happen about alia's career sakal
मनोरंजन

तिशीच्या आत आई होण्याची कपूरांची परंपरा आलियानंही राखली! पण.. करियरचं काय?

नीलेश अडसूळ

आलिया भट्टने(Alia Bhatt) सोमवारी २७ जून,२०२२ रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास सोशल मीडियावर आपल्या प्रेग्नेंसीची (Pregnancy) बातमी जाहिर केली. इन्स्टाग्रामवर आलियानं एक फोटो शेअर केला आहे,ज्यात ती हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेली आहे आणि तिच्या शेजारी पाठमोरा रणबीर कपूर (ranbir kapoor) बसला आहे. आणि दोघेही समोर असलेल्या अल्ट्रासाऊन्ड मशिनच्या मॉनिटरकडे एकटक पहात आहेत. या फोटो नंतर आता चर्चाना उधाण आले आहे. (Alia Bhatt, Ranbir Kapoor announce pregnancy) ( after pregnancy what will happen about alia's career )

आलिया गरोदर आहे यावर आता सगळ्यांनी विश्वास ठेवल्याने अनेकांना तिच्या भविष्याची चिंता सतावत आहे. प्रेगनन्सी नंतर ती चित्रपटात दिसणार की नाही या विचाराने चाहते हैराण झाले आहेत. शिवाय कपूर घराण्याची परंपरा पाहिली तर सर्व सूना या ३० वर्षांच्या आतच आई झाल्या आहेत. शिवाय त्यांनी पुढचं आयुष्य कुटुंबासाठी दिलं आहे. त्यामुळे आलियाच काय होणार हा चर्चेचा विषय ठरत आहे.

आलिया ही कपूर घराण्याची आपल्याला परिचित असलेली चौथ्या पिढीची सून. वयाच्या २९ व्या वर्षी आलियाने अभिनेता रणबीर कपूरशी लग्नगांठ बांधली. एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह झाला आणि आलियाने दोन महिन्यातच एक गोड बातमी दिली. पण कपूर घराण्याचा एक इतिहास आहे. ज्यामध्ये सर्व सूनांनी वयाच्या 30 व्या वर्षाच्या आत बाळाला जन्म दिला आहे आणि पुढेत्या चित्रपट सृष्टीतून बाहेर पडल्या आहेत. आता प्रेगनन्सी नंतर आलियासुद्धा आपल्या सासवांसारखी ब्रेक घेणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

बबिता कपूरचं रणधीर कपूर यांच्यासोबत लग्न झालं होतं. बबिता कपूर या अभिनेत्री होत्या. पण त्या लग्नानंतर 26 व्या वर्षी आई झाल्या. करिष्मा कपूर आणि करुना कपूर अशा दोन मुलींना त्यांनी जन्म दिला. अभिनेते ऋषी कपूर यांनी नीतू कपूर यांच्याशी विवाह केला. नितू कपूरही लग्नाच्या आधी अभिनेत्री होत्या. लग्नानंतर त्यांनी आपल्या कुटुंबावर लक्ष केंद्रित केलं. नितू कपूर यांनी 22 व्या वर्षी पहिल्या आपत्याला जन्म दिला. रिद्धिमा आणि नंतर पाठोपाठ रणबीरचा जन्म झाला. आता आलियासुद्धा आई होणार आहे. त्यामुळे आलियाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT