Alia Bhatt, Ranbir Kapoor marriage ceremonies following the Punjabi traditions. Alia Ranbir wedding news Google
मनोरंजन

आलिया-रणबीरचं पारंपरिक लग्न! 'या' पद्धतीत रंगणार विवाहसोहळा

सूत्रांच्या माहितीनुसार,आलिया-रणबीरचं लग्न येत्या १७ एप्रिल,२०२२ रोजी पार पडणार आहे.

प्रणाली मोरे

ज्या लग्नाची अख्खं बॉलीवूड नाही तर समस्त चाहतावर्ग मनापासून वाट पाहत होतं ते अखेर आता १७ एप्रिल २०२२ रोजी होणार आहे. कपूरांचा लाडला रणबीर(Ranbir), भट्ट यांच्या आलियाशी(Alia Bhatt) लग्न करुन अखेर लग्नबंधनात अडकणार हे कळलं अन् चर्चा रंगली. अनेक तर्कवितर्क लावले जाऊ लागले. पण आता काही गोष्टींचा उलगडा झालाय ज्यावर कन्फर्मचा स्टॅम्प मारण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रणबीर-आलिया चेंबूर येथील कपूर मेन्शनमध्ये सात फेरे घेणार आहेत. म्हणजे लग्नाचं स्थळ तर ठरलं आहे. तर विवाहसंबंधित सर्व सोहळे १३ किंवा १४ एप्रिलपासून सुरू होणार असल्याचं बोललं जात आहे. आता लग्नाला काहीच दिवस राहिले असताना सूत्रांच्या माहितीनुसार हे लग्न पारंपरिक पंजाबी पद्धतीनं होणार आहे. अद्याप कपूर कुटुंबाकडून कोणीच लग्नाच्या तारखेवर शिक्कामोर्तब कलं नसलं तरी १७ एप्रिल कपूरांसाठी मोठा दिवस आहे हे चाहते मात्र धरुन चालले आहेत. या सोहळ्याविषयी कुटुंबानं मात्र एकदम चुप्पी साधली आहे. (Alia Ranbir wedding news)

आर के हाऊसमध्ये हे लग्न होणार आहे आणि सगळ्या पंजाबी पारंपरिक विधी साजऱ्या करुन बरं का. कपूरांच्या घरातील लग्नसोहळे नेहमीच गाजले आहेत. कुटुंब हे नेहमी कपूरांसाठी अग्रस्थानी राहिलं आहे. कपूर कुटुंबाला सण,सोहळे साजरे करण्याची जुनी परंपरा आहे. त्यात रणबीरच्या पिढीतलं त्याचं शेवटचं लग्न. त्यामुळे अर्थातच कपूर्स पारंपरिक विधी करताना कुठेच कमी पडणार नाहीत. आर के हाऊसचा मोठा लॉन या निमित्तानं सजेल अन् मग जमतील कपूरांचे सगे-सोयरे. अर्थातच हे सगळं फोटोच्या माध्यमातून का होईना पण पहायला प्रत्येकाला आवडेलच.

अद्याप फक्त बोललं जातंय की लग्नाला कपूर कुटुंबाचे जवळचे आप्तेष्ट आणि मित्र-परिवार असणार आहेत. पण त्यात कोणकोण अशी यादी काही समोर आलेली नाही. पण कळतंय की,रणबीरनं एक खास लिस्ट बनवली आहे ज्यात त्यानं अनेक वर्ष ज्या टेक्निशियन्स,मेकअप आर्टिस्ट,हेअर आर्टिस्ट,स्पॉट बॉय,असिस्टंट्स यांच्यासोबत काम केलंय त्या सर्वांची नावं आवर्जुन नमूद करण्यात आली आहेत. रणबीरचे बेस्ट फ्रेंड्स अयान मुखर्जी,करण जोहर,आदित्य रॉय कपूर,विकी कौशल,रणवीर सिंग यांचाही समावेश रणबीरच्या गेस्ट लिस्टमध्ये आहे बरं का. आता अर्थात यानिमित्तानं कतरिना आणि दीपिकाही रणबीरच्या लग्नाला हजर असणार हे वेगळं सांगायला नको.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT