Alia Bhatt has reacted to a fanmade video which shows a Kabir Singh kind of fan running after a car with ‘Alia Weds Ranbir’ written on it.  Google
मनोरंजन

आलियाच्या लग्नाची बातमी ऐकून चाहता बनला 'कबीर सिंग'; पहा कसा सैरभैर झालाय

आलियाच्या चाहत्यानं स्वतः कबिर सिंग स्टाईलमधला व्हिडीओ पोस्ट केल्यावर खुद्द अभिनेत्रीलाही हसू आवरले नाही.

प्रणाली मोरे

आलिया भट्ट(Alia Bhatt) लग्न करतेय म्हटल्यावर तिच्या अनेक चाहत्यांचं मन तुटलं असणार यात शंकाच नाही. त्यापैकी एका चाहत्यानं चक्क 'कबिर सिंग' सिनेमात हार्टब्रेक झालेल्या प्रियकराची अवस्था आता आपली झालीय हे आलियाला सांगण्यासाठी चक्क एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. जो पाहून आलियालाही हसू आवरलं नाही. तीनं लग्नाच्या घाईगडबडीतनं वेळ काढत त्या व्हिडीओवर कमेंट केली आहे. आलिया लवकरच आपला बॉयफ्रेंड रणबीर कपूर(Ranbir Kapoor)सोबत या आठवड्यात लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. हा व्हिडीओ खरंतर एका युट्युबरनं बनवला आहे,ज्याचं नाव आहे निक लोटिया. जो डिजिटल कॉन्टेंट नेहमी अपलोड करताना दिसतो. सोशल मीडियावर या युट्युबरला 'beyounick' या नावानंही ओळखलं जातं.

या युट्युबरने पोस्ट केलेल्या व्हिडीओत आपण पाहू शकाल की,तो रस्त्यावर गाड्यांच्या गर्दीतून विनाचप्पल सैरभैर होऊन धावत सुटलाय अगदी कबिर सिंग मधील शाहिद प्रमाणेच. त्यानं व्हिडीओत पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पजामा आणि डोक्यावर टोपी घातली आहे. तो ज्या गाडीच्या मागे धावत आहे त्या गाडीवर पाठच्या बाजूला Alia weds Ranbir असं एका बोर्डवर लिहिलं आहे. तसंच याच व्हिडीओत निक विथ आलिया हा फोटो अचानक बदलत तिथे आलिया विथ रणबीरचा फोटो दिसतो. त्या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला 'तु मेरी है,मेरी ही रहेगी' हे कबीर सिंग मधील गाणं वाजत आहे. Beyounick या युट्युबरनं हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्याला कॅप्शनही समर्पक दिलं आहे. त्यानं लिहिलंय,''Me on 17th April...''आणि त्यानं हार्ट इमोजीही दिलाय कॅप्शनमध्ये. “Me on 17th April (broken heart emoji) … #aliabhatt #ranbirkapoor #feelitreelit #feelkaroreelkaro #heartbreak #newreel #kabirsingh.” या आपल्या पोस्टपुढे त्यानं लिहिलंय ''Ded'' आणि एक स्माइली इमोजी पोस्ट केला आहे.

या व्हिडीओवर रणबीरची चाहती असलेली अभिनेत्री आशा नेगीनं प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणालीय,''चल मी सुद्धा धावते तुझ्याबरोबर''. इतरांनी देखील या व्हिडीओवर मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. कुणी म्हणतंय,'बिचारा निक,आलिया दूर चालली तुझ्यापासून'. तर कुणी म्हणतंय, 'तुला कुणी बाईकवरुन न्यायला पण आलं नाही. ना भाऊ,ना मित्र'. तर कुणी त्याचं सांत्वन करताना म्हटलं,'हरकत नाही,ही गेली पण तुला तुझी आलिया लवकरच मिळेल'. तर असा एकंदरीत हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होऊन मजेदार कमेंट त्यावर वाचायला मिळत आहेत.

आलिया-रणबीरच्या लग्नाच्या अनेक उलट-सुलट बातम्यांनंतर दोन दिवसांपूर्वीच आलियाचे काका रॉबिन भट्ट यांनी लग्नाचं कन्फर्मेशन दिलं होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार आलिया रणबीर १४ एप्रिलला लग्न करणार आहेत. रणबीरच्या बांद्रा येथील घरी लग्नातील मेहेंदी सोहळा १३ तारखेला होणार आहे. तर आर.के हाऊस मध्ये लग्न होणार असल्याचं देखील आलियाच्या काकांनी कन्फर्म केलं. आता तर आर.के हाऊस रोषणाईनं झगमगतंय याचे फोटोही व्हायरल होत आहेत. चला,अनेक वर्ष डेटिंग केल्यानंतर अखेर रणबीर-आलिया लग्न करतायत तेव्हा त्यांच्या 'ब्रह्मास्त्र'सिनेमाला देखील लवकर प्रदर्शनाचा मुहूर्त मिळो या शुभेच्छा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT