Alia Bhatt trolled at Gucci Cruise 2024 gala  esakal
मनोरंजन

Alia Bhatt Trolled : 'एवढी मोठी अभिनेत्री तू रिकामी पर्स घेऊन गेलीस!'

सध्या आलिया एका प्रसिद्ध विदेशी बॅगच्या ब्रँडच्या सोहळ्यात ट्रोल झाल्याची बातमी समोर आली आहे.

युगंधर ताजणे

Alia Bhatt at Gucci Cruise 2024 : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट ही नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असते. आलियाचा चाहतावर्गही मोठा आहे. आलिया इंस्टावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. आलियाची लाडकी लेक राहा आणि ती चाहत्यांच्या कुतूहलाचा विषय आहेत.

सध्या आलिया एका प्रसिद्ध विदेशी बॅगच्या ब्रँडच्या सोहळ्यात ट्रोल झाल्याची बातमी समोर आली आहे. त्या शोमध्ये आलियाचे जाणे आणि एका कारणामुळे ती नेटकऱ्यांच्या टीकेचा विषय होणे हे सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. गुची ग्लोबल ब्रँड आहे. आलिया ही ती त्या ब्रँडची भारतातील ब्रँड अॅम्बेसिडर झाली असून चाहत्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

आलियानं मेट गालाच्या इव्हेंटवर रँप वॉक केला होता. त्यामुळे ती चर्चेत आली. मात्र त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. आलियानं या सोहळ्यासाठी ब्लॅक कटआऊट शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. त्यातील तिच्या पेहरावानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. आलियानं त्यामध्ये जी पर्स सोबत घेतली होती ती पारदर्शी होते. त्यात काहीच नव्हते. त्यामुळे नेटकऱ्यांनी आलियाची शाळा घेतली आहे.

आलियानं पर्समध्ये काहीच न ठेवल्यानं नेटकऱ्यांना आलियाचा भलताच राग आला आहे. त्यांनी तिला ट्रोल केले आहे. हे काय आलिया तुझ्या पर्समध्ये तर काहीच नाही. अशा शब्दांत तिची फिरकी घेतली आहे. एकानं म्हटलं आहे की, तुझी पर्स खाली का आहे, दुसऱ्यानं लिहिलं आहे की, तुम्हाला प्रत्येक गोष्टीत नकारात्मकता कशी काय दिसते, काहीच सकारात्मक नाही का, असा प्रश्न विचारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरला यलो अलर्ट

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT