Alia Bhatt Google
मनोरंजन

मनिष मल्होत्रा की सब्यासाची? लग्नात कोणत्या डिझायनरचा लेहेंगा घालणार आलिया?

सूत्रांच्या माहितीनुसार आलिया भट्टनं आपला नेहमीचा आवडता डिझायनर मनिष मल्होत्राला डिच्चू दिल्याचं कळत आहे.

प्रणाली मोरे

बी टाऊनमध्ये लवकरच लग्नाचे सनईृ-चौघडे वाजणार आहेत. आता गोष्टच खास आहे या लग्नाची. केवळ बॉलीवूडकरांनाच नाही तर सर्वनसामान्य चाहत्यांनाही या लग्नाची उत्सुकता गेली कित्येक वर्ष लागून राहिली होती. कधी करणार आलिया(Alia Bhatt)-रणबीर (Ranbir Kapoor)लग्न? या सगळ्यांच्या प्रश्नाला अखेर उत्तर मिळालं. आता प्रत्येकजण जो लग्नात प्रत्यक्ष सामिल आहे आणि जो चर्चेतून सामिल आहे असे सारेच त्या सोहळ्याची धामधूम,लगबग एन्जॉय करायला लागले आहेत. वेडिंग मेन्यूपासून ते वेन्यूपर्यंत प्रत्येक गोष्ट स्पेशल असणार आहे या लग्नात. मग अशात नवरीच्या लहेंग्याची चर्चा नाही होणार तर कसली चर्चा रंगणार. चला, आलिया तिच्या लग्नात कोणता डिझायनर लेहेंगा घालतेय ते जाणून घेऊया.

हो हे खरं आहे, आलिया-रणबीरचं लग्न कन्फर्म झालंय. चाहत्यांना आता उत्सुकता आहे ती आलिया भट्ट कोणत्या डिझायनरचा लेहेंगा घालून नवरी म्हणून मिरवणार आहे. तसं पहायला गेलं तर आलिया नेहमीच मनिष मल्होत्राच्या डिझायनर कपड्यांना आतापर्यंत पसंती देताना दिसली आहे. तसंच,मनिष मल्होत्राशी तिचं पर्सनल बॉन्डिंगही खास आहे. त्यामुळे लग्नातही आलिया मनिष मल्होत्रानं डिझाईन केलेला लेहेंगाच घालेल असं बोललं जात असताना बातमी आहे की दीपिका,कतरिना प्रमाणेच आलियानंही लग्नासाठी 'सब्यासाची' च्या लेहेंग्याला पसंती दिली आहे. आणि आता आलिया लग्नात सब्यासाचीनं डिजाईन केलेला लेहेंगा घालून नव्या नवरीच्या रुपात दिसणार आहे. याच लेहेंग्यात ती रणबीर कपूरसोबत सात फेरे घेणार आहे.

आलिया भट्टच्या आधी अनुष्का शर्मा,दीपिका पदूकोण,कतरिना कैफ,पत्रलेखा या बीटाऊनच्या टॉप अभिनेत्रींनी आपल्या लग्नाच्या दिवसाला सब्यासाची नं डिझाईन केलेला लेहेंगा घालून स्पेशल बनवलं आहे. आता सगळ्यांच्या नजरा आलियाच्या ब्रायडल लेहेंग्यावर टिकून राहणार यात शंकाच नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT