Alia Bhatt wore old sandals on the wedding, Google
मनोरंजन

आलियानं लग्नात घातलेल्या सॅंडल्सची का रंगलीय चर्चा?

आलिया भट्टचा ब्रायडल लूक खूपच साधा असल्याकारणानं जास्त चर्चेत आला.

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर(Ranbir Kapoor)आणि आलिया भट्ट(Alia Bhatt)च्या लग्नाती खूपच जास्त चर्चा रंगली होती. या लग्नाचे फोटो देखील जोरदार व्हायरल झाले होते. आलिया भट्टचा ब्रायडल लूक खूपच साधा असल्याकारणानं जास्त चर्चेत आला. नो वेडिंग मेकअप लूक आणि लाइटवेट साडीनंतर आता आलियाच्या पायातील सॅंडलचीही चर्चा रंगली आहे.

आलियानं आपल्या लग्नात नवीन सॅंडल विकत घेतल्याच नव्हत्या आणि नववधूच्या पेहरावात आलिया जुन्या सॅंड्लस घालून दिसली. लग्नाच्या दिवशी तिनं आपली जुनी कोल्हापुरी हिल्स घातली होती. वेडिंगस्पाराजी नावाच्या एका इन्स्टा अकऊंटवर केलेल्या पोस्टच्या माध्यमातून समोर आलं आहे की लग्नानंतर जेव्हा पहिल्यांदा आलिया घराबाहेर पडली तेव्हा तिनं त्याच वेडिंग सॅंडल्स घातल्या होत्या.

आपल्या लग्नाच्या खास दिवशी आलिया भट्टनं आपली जुनी कोल्हापुरी हील्स घातली होती,जी तिनं आपला सिनेमा 'गंगूबाई काठियावाडी' च्या प्रमोशननिमित्तानं घातली होती. ३.५ इंचाची ही सॅंडल स्टॉफस्टाइल ब्रॉंडनं डिझाईन केलेली आहे,याची किंमत फक्त ३,८०० रुपये आहे. एवढंच नाही तर अभिनेत्री या सॅंडलला घालून अनेक कार्यक्रमात दिसली आहे.

रणबीर आलियानं १४ एप्रिल २०२२ रोजी आपल्या घरी 'वास्तू' मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांनी आपल्या त्या घरातील बालकणीत लग्न केलं,जिथे त्यांनी आपल्या नात्याची लग्नाआधीची पाच वर्ष घालवली. त्यांचे वेडिंग आऊटफिट्स खुपच सुंदर होते. दोघांनी आयवरी रंगाचा पेहराव घातला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT