Amitabh Bachchan: बॉलीवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन वयाच्या ७९ व्या वर्षीही कामात टोटल बिझी आहेत. जिथे एकीकडे ते धडाधड सिनेमे साइन करत सुटले आहेत,तर दुसरीकडे प्रॉपर्टीमध्ये देखील त्यांची गुंतवणूक वाढताना दिसत आहे. अमिताभ बच्चन यांनी २०२१ मध्ये ३१ करोड रुपयांचे आलिशान घर खरेदी केलं होतं आणि आता पुन्हा मुंबईच्या पॉश विभागात एक पूर्ण मजला खरेदी केल्याची बातमी कानावर पडली आहे.(Amitabh Bachchan Buy New Home In mumbai, Read about his property details till date.)
अमिताभ बच्चन यांनी मुंबईत अंधेरीमध्ये चार बंगला विभागातील Parthenon इमारतीत ३१ व्या मजल्यावर आलिशान घर खेरदी केलं आहे, जे १२ हजार स्क्वेअर फीटचं आहे. अमिताभ यांनी ही जागा राहण्यासाठी नाही तर केवळ गुंतवणूक म्हणून खरेदी केली आहे. पण अद्याप या पू्र्ण जागेची मूळ किंमत किती आहे आणि डील कितीला झाली याविषयी अधिक माहिती मिळालेली नाही.
अमिताभ बच्चन सध्या जलसा बंगल्यात राहत आहेत. त्यांचा आणखी एक बंगला आहे,ज्याचं नाव आहे प्रतिक्षा. अमिताभ बच्चन यांनी २०२१ मध्ये ३१ करोडला एक घर घेतलं होतं ज्याची खूप चर्चा रंगली होती. त्यांनी त्या घराला २०२० मध्ये खरेदी केलं होतं,पण त्याचं रजिस्ट्रेशन २०२१ मध्ये झालं. रिपोर्ट्सनुसार,अमिताभ बच्चन यांनी यासाठी जवळ-जवळ ६२ लाख रुपये स्टॅंप ड्युटी भरली होती. अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीचा आकडा यामुळे भलताच वाढला आहे. २०१३ मध्ये अमिताभ बच्चन यांनी एक प्रॉपर्टी खरेदी केली होती. तेव्हा त्यांनी जुहू मध्ये आपल्या जलसा बंगल्याच्या पाठी लागून असलेला एक बंगला खेरदी केला होता,ज्याची किंमत ५० करोडहून अधिक होती.
अमिताभ बच्चन यांनी २०२१ मध्ये आपल्या या जुहू स्थित 'अम्मू आणि वत्स' बंगल्याचा ग्राउंड फ्लोर एसबीआय बॅंकेला भाड्याने दिला होता. तिथूनही मोठ्या रकमेचं भाडं ते वसूल करत आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी अंधेरी स्थित आपलं एक घर अभिनेत्री कृती सननला भाड्याने दिलं होतं.
जवळपास गेल्या ५ दशकांहून अधिक काळ फिल्म इंडस्ट्रीत काम करणारे अमिताभ बच्चन आजच्या तारखेला बॉलीवूडमधील महागड्या अभिनेत्यांच्या पंक्तीत विराजमान आहेत. सिनेमांसोबतच ब्रॅन्ड्स,एंडोर्समेंट आणि इतरही काही गोष्टींमधून अमिताभ करोडोची कमाई करतात. आजही त्यांच्याकडे सिनेमांच्या भरपूर ऑफर्स येतात. तर दुसरीकडे त्यांचा 'कौन बनेगा करोडपती १४' हा शो जोरदार सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा टीव्हीचा सगळ्यात प्रसिद्ध शो राहिला आहे. हा शो होस्ट करण्यासाठी देखील ते तगडी फी घेतात.
अमिताभ बच्चन यांना आपण 'ब्रह्मास्त्र' मध्ये पाहिलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या 'उंचाई' सिनेमाचा फर्स्ट लूकही शेअर करण्यात आला आहे. अमिताभ यांच्याजवळ आता जवळपास ७ सिनेमे आहेत. 'गणपत','ऊंचाई', 'घूमर','प्रोजेक्ट के','बटरफ्लाय', 'द उमेश क्रॉनिकल्स' आणि 'गूडबाय' अशी त्या सिनेमांची नावं आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.