Amitabh Bachchan AI Photo: Esakal
मनोरंजन

Amitabh Bachchan: "जस्ट लुकिंग लाईक अ वॉव!" अमिताभ बच्चन यांनाही AIची भुरळ! फोटोवर नेटकरी फिदा

अमिताभ बच्चन यांनी एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे ज्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

Vaishali Patil

Amitabh Bachchan Shares his AI Image:  बॉलिवूड शहंशाह अमिताभ बच्चन हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. काही दिवसांपुर्वीच अमिताभ हे गणपत या चित्रपटात दिसले. अमिताभ चित्रपटात जितके सक्रिय असतात तितकेच ते सोशल मिडियावर देखील सक्रिय असतात. त्यांच्या चाहत्यांची संख्याही काही कमी नाही. अमिताभ त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल पोस्ट चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

काही भन्नाट व्हिडिओ देखील ते चाहत्यांसोबत शेयर करत असतात. X (पूर्वीचे ट्विटर) वरील त्यांचे ट्विट असो किंवा इंस्टाग्रामवरील त्यांच्या अनोख्या पोस्ट असो बच्चन हे नेहमी सोशल मिडियावर चर्चेत असतात. आता अमिताभ बच्चन यांनी एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे ज्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

खर तर हा अमिताभ बच्चन यांचा खरा फोटो नसून तो त्यांच्या AI फोटो आहे. जो स्वत: अमिताभ यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचा हा फोटो चाहत्यांना खुप आवडला आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे तयार केलेला स्वतःचा फोटो पोस्ट करत अमिताभ यांनी लिहिले, "AI जिंदाबाद!".

अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेला मोनोक्रोम फोटोत ते ब्लॅक अँड व्हाईट सूट आणि पोल्का डॉट टायमध्ये बिग बी कमालीचे सुंदर दिसत आहे. त्यांचे डोळे निळे आहेत. त्यावर त्यांनी चष्मा घातला आहे. सध्या त्यांचा हा फोटो सोशल मिडियावर खुप व्हायरल होत आहे. नेटकरी यावर प्रतिक्रिया देत आहेत. AI पेक्षा तुम्ही ओरीजनलच बॉस आहात असं नेटकरी म्हणत आहेत.

एकानं लिहिलंय की, "हा फोटो पेंटिंगसारखा दिसतोय". तर दुसऱ्याने लिहले, "सर, तुम्ही AI पेक्षा चांगले दिसता."

अमिताभ बच्चन यांच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचं झालं तर तब्बल 33 वर्षांनंतर थलायवर 170 या चित्रपटासाठी साऊथ स्टार रजनीकांतसोबत अमिताभ बच्चन काम करत आहेत.

नुकतेच ते टायगर श्रॉफ आणि क्रिती सॅननसोबत 'गणपत' या अॅक्शन चित्रपटात दिसले आता ते 'कल्की 2898 एडी' आणि 'बटरफ्लाय' या चित्रपटात दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : जर आयोगाने त्या घटनेनुसार असलेल्या संघटनात्मक रचनेची तपासणी केली असती, तर केवळ विधिमंडळातील बहुमताच्या आधारे हा वाद सोडवणे त्यांना कधीच शक्य झाले नसते - सिब्बल

Retired Cricketer Pension : सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग की सौरव गांगुली, कोणाला मिळते सर्वाधिक निवृत्तीवेतन?

पुरस्कार सोहळ्यात नाना पाटेकरांनी माधुरीची घेतली फिरकी, म्हणालेले... 'तुला खुप मिळाले पण...'

Zeeshan Siddique Death Threat : बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर आमदार झिशान सिद्दीकींना धमकी 'वडिलांच्या हत्येच्या वेळी नशिबाने वाचलास, आता...'

Koyna Water Project : कोयनेचे पाणी मुंबईला नेण्यासाठी 40 हजार कोटींचा खर्च! वाशिष्ठीत वाया जाणारे पाणी मुंबईची भागवणार तहान? कोयनाच्या अवजलावर डोळा?

SCROLL FOR NEXT