Amitabh Bachchan  
मनोरंजन

बिग बी यांना खीर देणारा भानूप्रताप झाला 'Macho Man'

बॉलीवूडचे शहेशहा अमिताभ बच्चन यांच्या अनेक (Bollywood Movies) चित्रपटांनी भारतीय प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Amitabh bachchan : बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या अनेक (Bollywood Movies) चित्रपटांनी भारतीय प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले आहे. बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं इतिहास घडवणाऱ्या (Entertainment News) अमिताभ यांच्या सूर्यवंशम या चित्रपटाची चर्चा (Bollywood news) होत असते. एका चॅनेलवर हा चित्रपट नेहमी ठराविक वेळेत प्रदर्शित होत असतो. त्याला मिळणारा प्रतिसाही मोठा आहे. गेल्या काही वर्षांपासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय आहे. त्यातील कित्येक कलाकारांना चाहत्यांकडून पोचपावती मिळताना दिसते. या चित्रपटामध्ये अमिताभ यांच्या नातवाची भूमिका करणाऱ्या भानू प्रताप उर्फ आनंद वर्धनच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.

अमिताभ यांनी सूर्यवंशम मध्ये भानुप्रताप सिंह यांची भूमिका केली आहे. त्यात त्यांच्या नातवाची भूमिका करणाऱ्या आनंदवर्धन याचेही नाव भानुप्रताप असे होते. आता त्याची एक जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी त्याचं कौतूक केलं आहे. आणि सूर्यवंशममध्ये असणाऱ्या छोट्या भानुप्रतापनं आता लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या त्या फोटोंना सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या सूर्यवंशम चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र तो चित्रपट जेव्हा टेलिव्हिजनवरुन प्रसारित झाला तेव्हा मात्र त्याचं रेटिंग वाढलं.

सूर्यवंशममध्ये अमिताभ यांचे संवाद लोकप्रिय झाले होते. त्यात छोट्या ठाकूर भानुप्रताप सिंह यांची भूमिका करणारा आनंदवर्धन हा आता मोठा झाला आहे. त्याला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आनंदवर्धनच्या त्या फोटोंवरुन त्याला मॅचो मॅन असं म्हटलं गेलंय. तो त्याच्या आगामी चित्रपटासाठी फोटोशूट करत असल्याचे दिसून आलं आहे. एका युझर्सनं लिहिलं आहे की, हा तोच निरागस मुलगा आहे का ज्यानं सूर्यवंशममध्ये अमिताभ यांच्या नातवाची भूमिका केली होती. दुसऱ्यानं लिहिलं आहे की, तो आता किती मोठा झाला आहे. त्याच्याकडे पाहून कौतूक वाटतं. आनंदनं यापूर्वी वेगवेगळ्या भाषांतील चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्कॉर्पिओला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत, मृतांमध्ये ZP सदस्यासह २ माजी सरपंचाचा समावेश

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगेंची पत्रकार परिषद! 30 मे पासून आमरण उपोषण

Badlapur Crime: बदलापुरात वडिलांच्या मित्रानेच १६ वर्षीय मुलीचा केला विनयभंग, मोबाईल चार्जिंगसाठी घरी आला अन्...

Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Kolhapur Student Death Case : बाबा दुप्पट फायदा मिळणार आहेत, पैसे पाठवा..., मुलीचे शेवटचे शब्द, कुटुंबीयांनी नाकारलं विद्यार्थिनीने नको ते केलं

SCROLL FOR NEXT