pathaan, shah rukh khan press conference, deepika padukon SAKAL
मनोरंजन

Pathaan: आणि भर पत्रकार परिषदेत दीपिका पदूकोणला अश्रू अनावर... म्हणाली..

शाहरुखनं वयाच्या ५७ व्या वर्षातही तोच बॉलीवूडचा बादशहा आहे हे सिद्ध केलंय.

Devendra Jadhav

Shahrukh Khan Press Conference: पाचशे करोडचा टप्पा ओलांडत किंग खानच्या पठाणनं आता १००० कोटी करण्याकडे आपली घोडदौड सुरू केली आहे. तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर झळकलेल्या शाहरुखनं वयाच्या ५७ व्या वर्षातही तोच बॉलीवूडचा बादशहा आहे हे सिद्ध केलंय.

आज पठाणचं यश आपल्या चाहत्यांसोबत शेअर करण्यासाठी.. शाहरुख खाननं एक पत्रकार परिषद घेतली होती. शाहरुखसोबत जॉन अब्राहम आणि दीपिका पदूकोण, दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद सोबत हजर आहेत. यावेळी दीपिका पादुकोणला जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ती भर पत्रकार परिषदेत गहिवरली..

पत्रकाराने दीपिकाला पठाणचा जो माहिमचा गैटी गॅलॅक्सी मध्ये माहोल होता त्याबद्दल प्रश्न विचारला. तेव्हा दीपिकाला अश्रू अनावर झाले. ती म्हणाली,"आम्ही असं पहिल्यांदा बघतोय. एवढं प्रेम. आणि हे आनंदाचे अश्रू आहेत. मला शाहरुख खानकडून कायम प्रेम आणि आदर मिळत आलाय." असं म्हणत दीपिकाने शाहरुखला प्रेमाने स्पर्श केला आणि तिला अश्रू अनावर झाले.

बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खानचे आता हवेत आहे असं म्हटलं तर वावगं नाही, शाहरूख खानचा चित्रपट प्रदर्शित होऊन केवळ तीन दिवस झाले आहेत आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम केले आहेत. शाहरुखच्या पठाणने आजवर ५०० कोटीची विक्रमी कमाई केली आहे.

शाहरुखचा 'पठाण' आता बॉक्स ऑफिसवरचे सर्व रेकॉर्ड धडाधड मोडत आहे. भारतभरातील संपूर्ण थेटरमधलं वातावरण पठाणमय झालं आहे. पठाण निमित्ताने शाहरुख खानने 4 वर्षांनंतर हिंदी इंडस्ट्रीत कमबॅक केलंय. शाहरुखच्या पठाण सिनेमाचं अनेक कलाकार तोंड भरून कौतुक करत आहेत.

अलीकडे शाहरुख लाल सिंग चड्ढा , रॉकेटरी, ब्रम्हास्त्र अशा सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला.पण प्रमुख भूमिका म्हणून ४ वर्षांनी शाहरुखने पठाण च्या माध्यमातून दमदार कमबॅक केलंय. ऍक्शन-थ्रिलर 'पठाण' २५ जानेवारीला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT