Aamir Khan And Annu Kapoor esakal
मनोरंजन

आमिरच्या 'लालसिंग चड्ढा'वर अन्नू कपूरची अजब प्रतिक्रिया ! तो कोण आहे?

'मी चित्रपट पाहात नाही. ना तुमचे, ना दुसऱ्यांचे, बस्स.'

सकाळ डिजिटल टीम

Annu Kapoor Reaction On Laal Singh Chaddha : आमिर खानचा चित्रपट 'लालसिंग चड्ढा' प्रदर्शित होण्यास काही दिवसच बाकी आहेत. एकीकडे चित्रपटाविषयी लोकांमध्ये उत्साह दिसत आहे. दुसरीकडे त्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. लालसिंग चड्ढाबाबत (Laal Singh Chaddha) आतापर्यंत अनेक बाॅलीवूड कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या दरम्यान अभिनेता अन्नू कपूर (Annu Kapoor)यांना चित्रपटाविषयी विचारले असता त्यांनी फारच अजब प्रतिक्रिया दिली. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यांना ट्रोल केले जात आहे. (Annu Kapoor Reaction On Aamir Khan Upcoming Movie Laal Singh Chaddha)

विरल भियानी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात आमिर खानच्या (Aamir Khan) लालसिंग चड्ढावर पत्रकार अन्नू कपूरला प्रश्न विचारतो. त्यावर अभिनेता म्हणतो, तो कोण आहे? मी चित्रपट पाहात नाही. मला माहित नाही. यावर अन्नू कपूरबरोबर बसलेला व्यक्ती म्हणतो, इतरांच्या चित्रपटांवर कोणतेही काॅमेंट नाही.

यावर अन्नू म्हणतात, नाही काॅमेंट करण्यासारखे काही नाहीच. मी चित्रपट पाहात नाही. ना तुमचे, ना दुसऱ्यांचे, बस्स. मला तर माहित ही नाही की ते कोण आहेत? मला खरचं माहित नाही की तो कोण आहे. तर काय उत्तर देऊ शकेल. मला त्याबाबत कोणतीही कल्पना नाही.

अन्नू कपूरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यावर त्यांना ट्रोलही केले जात आहे. काहींनी त्यांना उद्धट म्हटले आहे. काहींनी अपशब्द वापरले आहेत. एकाने विचारले की आमिर खानला एखादा कसे ओळखत नसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्यात मोठी घसरण! 21 दिवसांतील नीचांकी दर; उच्चांकापेक्षा तब्बल ₹23,500 कमी; आजचा ताजा भाव पाहा

Sankashti Chaturthi 2026: 3 वर्षांनी जुळून आलाय दुर्मिळ विभुवन योग! बाप्पाच्या कृपेने मेषसह ‘या’ 2 राशींचं नशीब अचानक चमकणार, होणार धनलाभाचा वर्षाव!

Khan Sir Patna Controversy : कोचिंग सेंटर बाहेर गोळीबाराच्या आरोपावरुन खान सरांचा यु-टर्न; नेमकं काय घडलं? सांगितले सत्य

Latest Marathi News Live Update : विधानपरिषद निवडणुकीतून माघारीसाठी रात्री उशिरापर्यंत उदय सामंत यांची खलबते

Dudh Halwa: फक्त मिठाई नाही, तर पिढ्यानपिढ्या जपलेला वारसा! ललितपूरच्या 'दूध हलव्या'ला जागतिक स्तरावर नेण्यासाठी सरकारचा मेगा प्लॅन!

SCROLL FOR NEXT