Anurag Kashyap jokes on daughter's Aaliyah Kashyap's engagement:  Esakal
मनोरंजन

Anurag Kashyap: 'आता इतका खर्च..', अनुरागला सतावतेय लेकीच्या लग्नासाठी लागणाऱ्या पैशांची चिंता

Vaishali Patil

Anurag Kashyap on daughter's Aaliyah's engagement: बॉलीवूड चित्रपट निर्माता अनुराग कश्यपची लाडकी मुलगी आलिया कश्यपने अलीकडेच सोशल मीडियावर तिचा प्रियकर शेन ग्रेगोइरसोबत तिच्या नात्याची घोषणा केली.आलियाने तिच्या बॉयफ्रेंडसोबत ऐंगेजमेंट केले. याचा खुलासा खुद्द आलियाने तिच्या पोस्टद्वारे केला आहे. इंटरनेटवर त्यांची तुफान चर्चा सुरु आहे.

अनुराग कश्यपची मुलगी आलियाने तिच्या प्रियकरासह तिची एंगेजमेंट रिंग फ्लॉंट करताना आणि किसिंग फोटोही शेअर केला होता.

यानंतर आता मुलीच्या एंगेजमेंटवर तिचे वडील अनुराग कश्यप यांनी पहिले प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या अनुराग कश्यप कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी फ्रान्सला गेला आहे. इथेच त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती मिळाली.

आलियाने अनुराग कश्यपला पापाच्या कर्तव्याची आठवण करून दिली

अनुराग कश्यपने आपल्या मुलीच्या एंगेजमेंटच्या बातमीवर प्रतिक्रिया देणारा एक फोटो शेअर केला आहे. ज्यासोबत त्याने एक लांबलचक नोट लिहिली.

अनुराग कश्यपने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो मित्रांसोबत बसलेला आहे. फोटोमध्ये तो चष्मा लावून फोनकडे बघताना दिसत आहे.

कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, @cinemakasam रागाने म्हणतो, "फोन इथेच ठेव!!" त्याला नाही माहित, माझ्या मुलीच्या लग्नासाठी मला किती रिमेक बनवावे लागतील याचा हिशेब मी इथं करत बसलो आहे. कारण माझी लाडकी मुलगी आलिया कश्यपने बॉयफ्रेंड शेनशी एंगेजमेंट केली आणि तेही आम्ही कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये असताना. याचबरोबर त्यानं आश्चर्य व्यक्त केले आहे.

अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप बऱ्याच दिवसांपासून बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरला डेट करत आहे. तो एक व्यावसायिक आहे. जो सॉफ्टवेअर कंपनी चालवतो. शेनला बराच काळ डेट केल्यानंतर अनुराग कश्यपची मुलगी आलियाने इंडोनेशियातील बाली शहरात लग्नाची मागणी घातली.  

आलिया कश्यप फक्त 22 वर्षांची आहे. आलिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि याआधीही तिने इन्स्टाग्रामवर तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो अनेकदा शेअर केले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: डोंबिवलीत राजकीय पलटवार! भाजपचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांचा शिंदे गटात प्रवेश

Julie Yadav: घरी विसरलेला मोबाईल परत आणायला गेली अन्...; भारतीय महिला हॉकी खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू, घटनेनं हळहळ

Organ Donation : अवयवदानासाठी राज्यांनी पुढाकार घ्यावा; रस्ते अपघातांतील मृतांबाबत केंद्र सरकारचे निर्देश देशात, अवयवदानाचे प्रमाण दहा लाखांमागे एक!

फी न दिल्यानं परीक्षेला बसू दिलं नाही, विद्यार्थ्यानं पेटवून घेतलं; प्राचार्य म्हणाले, २५ हजाराचा फोन अन् १ लाखाची गाडी वापरतो

Gujarat Ats : गुजरात एटीएसची मोठी कारवाई: 'रायसिन' विष तयार करणाऱ्या डॉक्टरसह तीन जण अटकेत!

SCROLL FOR NEXT