Bigg Boss 16 esakal
मनोरंजन

Bigg Boss 16 : बिग बॉसमध्ये राडा! अर्चनानं विकासवर टाकलं गरम पाणी

साऊथची सनी लियोनी म्हणून जिच्या नावाचा उल्लेख केला जातो त्या अर्चना गौतमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss 16: साऊथची सनी लियोनी म्हणून जिच्या नावाचा उल्लेख केला जातो त्या अर्चना गौतमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तिला राग आल्यानंतर तिनं जे काही केलं त्यामुळे तिला नेटकऱ्यांनी तिच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

अर्चनाला राग अनावर झाला आणि तिनं चहासाठी जे गरम पाणी ठेवले होते तेच विकासच्या अंगावर टाकले. त्यामुळे विकासनं देखील तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केी आहे. ते पाणी प्रियंकाच्या अंगावर सांडले आहे. प्रियंकानं अर्चनाला तू वेडी आहेस का, काहीही काय करतेस, असा प्रश्न तिला विचारला आहे.

Also Read - जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. येत्या एपिसोडमध्ये बिग बॉसमध्ये काय घडलं आहे याची कल्पना तो व्हिडिओ पाहिल्यानंतर येते. त्यावर नेट्कऱ्यांनी अर्चनाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. दरवेळी अर्चना तुझी मनमानी चालणार नाही. बिग बॉस आता अर्चनाला कडक शब्दांत समज देण्याची वेळ आली आहे. अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

यापूर्वी देखील अर्चना गौतमनं शिव ठाकरेशी पंगा घेतला आहे. ज्यामध्ये तिनं शिव ठाकरेचा गळा दाबला होता. त्यानंतर तिला बिग बॉसनं शोच्या बाहेर काढलं होतं. मात्र सलमाननं तिला पुन्हा शो मध्ये आणलं होतं. तिनं माफी मागत आपली चूक झाल्याचे म्हटले होते. आपण पुन्हा असे वागणार नाही हे तिनं म्हटलं होतं.

अर्चना ही नेहमीच कुणाशी ना कुणाशी भांडताना दिसते. बिग बॉसमधील तिचे बाकी सहकारी तिला वैतागले आहेत. विशेष म्हणजे बिग बॉसनं सांगितल्यानंतर देखील ती काही ऐकायला तयार नसते. एवढा तिचा मोठा दरारा आहे. आता तर तिनं विकासवर गरम पाणी टाकून वेगळाच वाज ओढून घेतला आहे. आता सलमान तिला काय शिक्षा देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT