Arijit Singh On Pasoori Nu ESakal
मनोरंजन

Arijit Singh On Pasoori Nu: 'म्हणून मी पसुरी गाणं गायलं', ट्रोलिंगनंतर अरिजितनं सांगितलं खरं कारण..

Vaishali Patil

Arijit Singh On Pasoori Nu: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा 'सत्य प्रेम की कथा' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. दोघांचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.

मात्र सध्या चित्रपट येण्यापुर्वीच त्याविषयी वाद तयार होत असतो. असचं काहीतरी 'सत्य प्रेम की कथा' या चित्रपटाबाबत घडलं आहे.

सध्या चित्रपटातील एका गाण्यावरून वाद सुरू झाला आहे. या चित्रपटातील 'पसूरी' या गाण्याचा गाणं नुकतच रिलिज झालं. 'पसुरी'च्या रिमिक्सवरून सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला आहे.

हे मुळ पाकिस्तानी गाणे आहे जे खुप हिट आहे. हे गाणे कोक स्टुडिओ पाकिस्तानच्या 'पसूरी' या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन आहे. मुळात 'पसूरी' गाणे अली सेठी आणि शाये गिल यांनी गायले आहे. जे लोकांना खूप आवडते. पण या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन पाहून लोक खुप संतापले होते. हे गाणे अरिजित सिंगने गायल्यामुळे त्यालाही ट्रोलही करण्यात येत होते.

सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर आता अरिजित सिंगने या गाण्यावर मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांने ट्विटरवर एका पोस्टद्वारे आपले म्हणणे मांडले आहे. या गाण्यावर अरिजित सिंगला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागल्यामुळे आता अरिजित सिंगने हे गाणे रिक्रिएट करण्याचे कारण दिले आहे.

त्याने हे गाणे फक्त स्वत:च्या फायद्यासाठी नव्हे तर एका उदात्त हेतूला हे गाणे गाण्यासाठी तयार झाला आहे. त्याने या कारणामुळेच टी-सीरीजच्या निर्मात्यांसोबत करार केल्याचे म्हटले आहे.

जेव्हा एका चाहत्याने त्याला विचारले की त्याने हे गाणं का गायलं, तेव्हा अरिजित म्हणाला की, गाण्याच्या निर्मात्यांनी त्याला वचन दिले आहे की ते एका वर्षासाठी गरजू मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या शाळेला निधी देणार आहेत.

त्यामुळे तो ' थोड्या शिव्या खाऊन घेईल'. त्याचवेळी या वक्तव्यानंतर आता अनेक लोक अरिजीज सिंह यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. त्याचे हे ट्विट सोशल मिडियावर व्हायरल झालं आहे. लोक त्याचं खुप कौतुक करत आहेत.

 'सत्य प्रेम की कथा' 29 जून रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे . सत्यप्रेम की कथाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे तर कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी त्यांच्याशिवाय गजराज राव, सुप्रिया पाठक, रितू शिवपुरी आणि माहरु शेख यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT